खुशखबर ! सलग तिसर्‍या दिवशी ‘पेट्रोल-डिझेल’ झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदल होत आहे. आज पेट्रोलच्या किंमती 9 पैसे लीटरने स्वस्त झाल्या. दिल्लीत पेट्रोल 24 पैशांनी तर डिझेल 16 पैशांना स्वस्त झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी होत असल्याने भारतात देखील याचा परिणाम पाहयला मिळत आहे.

इंडियन ऑइलचे आज मुंबईतील आणि कोलकत्तातील दर पेट्रोल 8 पैसे प्रति लीटर स्वस्त झाले. तर दिल्ली, मुंबई आणि चेन्नई येथील डिझेलचे दर 5 पैसे प्रतिलीटरने स्वस्त झाले. मुंबई, दिल्ली, चेन्नई येते पेट्रोलचे दर क्रमश: 77.46 रुपये, 71.77 रुपये, 74.57 रुपये प्रति लीटर हे आहेत. तर डिझेल स्वस्त झाले असून क्रमश: 68.26 रुपये, 65.09 रुपये आणि 68.79 प्रति लीटर असे झाले आहे.

दररोज घोषित करण्यात येणारे पेट्रोल
डिझेलचे भाव सकाळी 6 वाजता जाहीर होतात. हे सर्व भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. तसेच देशात लागू होणाऱ्या किंमतीवर अबकरी कर, डिलर कमीशन दर शुक्ल लागून ग्राहकांपर्यंत पोहचवले जातात.

आपल्या शहरातील इंधनाचे दर तुम्ही देखील तपासू शकतात
यासाठी एका विशेष नोंदणी क्रमांकावर तुम्हाला SMS पाठवावा लागेल. यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपवरुन डिलरचा कोड घ्यावा लागेल. त्यानंतर ही सेवा तुम्हाला उपलब्ध होईल.

एका SMS वरुन असे जाणून घ्या दर
1.
बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222

2. एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

3. इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड> 92249 9 2249