07 September Rashifal : वृषभ, कर्क आणि मिथुन राशीच्या जातकांचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल, वाचा दैनिक भविष्य

नवी दिल्ली : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन कुंडली दैनंदिन घडामोडींचे भाकीत करते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कुंडली अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचे भविष्य सांगतात. दैनिक राशिफळ (Dainik Rashifal) हे ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित एक जन्मकुंडली आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) दैनंदिन अंदाज स्पष्ट केले जातात. ही कुंडली काढताना ग्रह नक्षत्रांसह पंचांगाच्या हिशोबाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते, आरोग्य आणि दिवसभर घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे भाकीत करते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. उदाहरणार्थ, ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या आधारावर, दैनंदिन कुंडली सांगते की आजचे तुमचे ग्रह-तारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही. आज आपल्याला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात हे समजू शकते. दैनंदिन कुंडली वाचून, तुम्ही दोन्ही परिस्थितींसाठी (संधी आणि आव्हाने) तयार राहू शकता.

मेष (Aries Daily Horoscope)
आजचा दिवस व्यस्त असणार आहे. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. कार्यक्षेत्रात काही बदल करायचे असतील नक्कीच चांगला फायदा होईल. इतरांच्या कामात जास्त लुडबूड करू नका, अन्यथा समस्या उद्भवू शकते. आरोग्याबाबत काळजी घ्या. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. कुटुंबातील कलह चर्चेने संपवा, अन्यथा समस्या उद्भवू शकते.

वृषभ (Taurus Daily Horoscope)
आजचा दिवस चांगला आहे. संततीकडून वेळेत त्यांचे काम करून घ्या. घाईघाईत केलेल्या कामामुळे चूक होऊ शकते. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळेल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने रखडलेले काम पूर्ण होईल.

मिथुन (Gemini Daily Horoscope)
आजचा दिवस उत्तम संपत्तीचे संकेत देत आहे. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अडचण येऊ शकते. नोकरीत अधिकाऱ्यांची कृपा राहील. संततीच्या वायफळ खर्चाला आळा घाला, अन्यथा समस्या येऊ शकते. जुना व्यवहार वेळेत पूर्ण होईल. मन अभ्यासातून विचलित होईल. भावंडांशी चर्चा करावी लागेल.

कर्क (Cancer Daily Horoscope)
आजचा दिवस पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा आहे. कुटुंबातील सदस्याच्या विवाहातील अडथळे दूर होतील. परदेशातील नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. घाई आणि भावनिक होऊन निर्णय घेणे टाळा. मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. विवाहाची बोलणी पक्की होईल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने रखडलेले काम पूर्ण होईल.

सिंह (Leo Daily Horoscope)
आजचा दिवस खर्चिक आहे. वाढत्या खर्चामुळे काळजी वाटेल. कुटुंबात सर्व जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराल. मनात प्रेम आणि जिव्हाळा राहील. राजकारणात मोठे पद मिळू शकते. संततीप्रती असलेल्या जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करा, अन्यथा ते नाराज होऊ शकतात. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा पोटाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकते.

कन्या (Virgo Daily Horoscope)
आजचा दिवस मौज-मस्तीचा आहे. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहतील. महत्त्वाच्या कामाबाबत चर्चा कराल. मित्रांसोबत काही योजनेत पैसे गुंतवू शकता. व्यवसायात चांगल्या विचारसरणीचा फायदा होईल. भागीदारीतील व्यवसायातून अपेक्षित लाभ मिळेल. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. एखादे काम डोकेदुखी ठरेल.

तूळ (Libra Daily Horoscope)
आजचा दिवस एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून उत्पन्न मिळवण्याचा आहे. घरातील एखादे काम उरकण्यात व्यस्त असाल. हंगामी आजार त्रास देऊ शकतो. नोकरीत इतरांच्या ऐकून दुसरी नोकरी जॉईन करू नका. परीक्षसाठी कठोर परिश्रम करावे लागतील, तरच यश मिळेल. संततीला दिलेले आश्वासन पूर्ण करावे लागेल.

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)
आजचा दिवस एकामागून एक चांगली बातमी घेऊन येणारा आहे. सरकारी काम पूर्ण करावे लागेल. सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने यश, कीर्ती वाढेल. परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. कुटुंबातील सदस्याची एखादी वाईट वाटेल. गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला आहे. मन भगवंताच्या भक्तीमध्ये गुंतून जाईल, यामुळे घरातील सदस्यांना आनंद होईल.

Advt.

धनु (Sagittarius Daily Horoscope)
आजचा दिवस खास आहे. दैनंदिन गरजांकडे लक्ष द्यावे लागेल. व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.
अन्यथा नुकसान होऊ शकते. घरासाठी काही उपयुक्त वस्तू खरेदी करण्याचा विचार कराल. नोकरीत काळजी घ्या.
मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल.

मकर (Capricorn Daily Horoscope)
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत मजेत वेळ घालवाल, ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील.
नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल. आर्थिक बाबीकडे लक्ष द्या, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात.
व्यवसायात सावधगिरी बाळगा. संततीला दिलेले आश्वासन पूर्ण करावे लागेल.

कुंभ (Aquarius Daily Horoscope)
आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. नातेवाईक घरी मेजवानीसाठी येऊ शकतो. प्रवासात महत्त्वाची माहिती मिळेल.
नशिबाने साथ दिल्याने अनेक समस्या सहज सुटतील. समस्या वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करा.
छोट्या प्रवासाला जावे लागेल. प्रतिकूल परिस्थितीत संयम राखा.

मीन (Pisces Daily Horoscope)
आजचा दिवस चिंताजनक असणार आहे. व्यवसायात चांगला नफा न मिळाल्याने थोडे चिंतेत असाल.
संततीच्या भविष्याबद्दल असलेल्या चिंतेसाठी योजना आखू शकता. आई-वडिलांना धार्मिक सहलीला घेऊन जाऊ शकता.
जोडीदारासोबत महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा कराल. व्यवहाराच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा करू नका,
अन्यथा समस्या उद्भवू शकतात. अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तरच परीक्षेत यश मिळेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध; राज्य सरकारला दिला इशारा

MHADA Pune Lottery | म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

Pune Dahi Handi – Traffic Updates | पुण्यात दहिहंडी उत्सावानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

रास्तापेठ अतिउच्चदाब उपकेंद्र दुरुस्तीसाठी बंद राहणार; मात्र वीजपुरवठ्यावर परिणाम नाही

‘ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते ‘घरातील महामहीम’ उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?’,
भाजपचा हल्लाबोल

Aaditya Thackeray | ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; वाचून दाखवला महायुती सरकारच्या तक्रारींचा पाढा