काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आज नरेंद्र मोदी

मोदींच्या सभेपुर्वी नांदेडला चोख पोलीस बंदोबस्त

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे नांदेडमधून लोकसभेच्या मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात भाजप-सेना रिपाई च्या युतीकडून प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आज नांदेड मध्ये येणार आहेत. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.

कारण गेली अनेक वर्षे काँग्रेस कडे सत्ता आहे. तेथूनच विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांना खरे तर आपली पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी द्यायची होती. मात्र, पक्षश्रेष्ठीच्या दबावाखातर त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे ही सभा नक्कीच गाजणार यात शंका नाही.लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. राज्यात भाजपकडून निवडणुकीच्या कालावधीत जास्तीत जास्त सभा घेतल्या जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात ८ सभा होणार असून नांदेड लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार प्रताप पा चिखलीकर यांच्या प्रचारासाठी मोदींची आज ६ एप्रिल रोजी नांदेडमध्ये जाहीर सभा होणार असल्याची विश्‍वसनीय सुत्रांनी माहिती दिली आहे. सभेची जयेत तयारी केली गेली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातील सर्व सभांच्या तारीखा निश्चित झाल्या असून काही ठिकाणी सभा देखील झाल्या मोदींनी वर्धा येथील सभेत काँग्रेस वर टीका तर केलीच पण त्याच बरोबर महायुती वर देखील टीकास्त्र झोडले.

आता सर्वांचे लक्ष नांदेड मध्ये होणाऱ्या सभेकडे लागून आहे. नांदेडची सभा शिवरत्न जिवाजी महाले चौक (कौठा) भाग येथे होणार आहे.मात्र,नांदेड मध्ये सभा दि ०५ एप्रिल पासूनच चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या चाहत्यांची गर्दी या सभेत ऐतिहासिक राहणार आहे.अशी चर्चा नांदेड व हिंगोली मतदार संघात सुरू आहे.

सभे पूर्वी काही अडथळा निर्माण होऊ नये त्या मुळे चोख पोलीस बंदोबस्त साठी अनेक पोलीस तैनात केलेले दिसले आहेत. नांदेड लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्‍ला आहे.म्हणून भाजपचे दिगग्ज स्टार प्रचारक नांदेड मध्ये येत असल्याची चर्चा सुरू आहे. नरेंद्र मोदी सभेसाठी भाजपा- शिवसेना रिपाई चे सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत अशी माहिती मिळाली आहे.