लोकसभेच्या त्या चार जागी राष्ट्रवादीची आजची स्थिती  

पोलीसनामा ऑनलाईन ( सुरज शेंडगे ) – लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सध्या वेगवान पध्द्तीने सुरु असून येत्या दोन महिन्यात लोकसभेच्या उमेदवारी बद्दल सर्वच पक्षांचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. २०१४ च्या लाटेत राष्ट्रवादीच्या चार जागा महाराष्ट्रात निवडून आल्या या चार जागी पक्षाची आजची स्थितीत काय आहे याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

सहकार क्षेत्राचे जाळे घट्ट असलेला पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो पक्षाच्या स्थापने पासून आजतागायत या भागाने राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. गत निवडणुकीत मोदी लाट असताना हि पश्चिम महाराष्ट्राने राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. कमी अधिक मताधिक्याने का होईना लोकांनी राष्ट्रवादीला लोकसभेच्या वाटेने अग्रेसर केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला ज्या चार जागी यश मिळाले त्या चार जागी पक्षाची आजची स्थिती काय आहे ते बघणे महत्वाचे ठरते.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
कोल्हापूरचे राजकारण कधीच राष्ट्रवादीच्या पूर्णपणे  कव्हेत आले नाही. कोल्हापूर जिल्ह्यात  राष्ट्रवादीला तुल्यबळ आणि प्रतिस्पर्धक म्हणून गणला जाणारा पक्ष हा  राष्ट्रवादीचाच मित्र पक्ष  म्हणजे काँग्रेस आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक २०१४ च्या निवडणुकीत  ६लाख ०७हजार ६६५ मते घेऊन ३३ हजार २५९ एवढ्या मताधिक्याने लोकसभेवर निवडून गेले तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रा. संजय महाडिक  याना ५ लाख ,७४ हजार ,४०६ मतांवर संतुष्ट रहावे लागले.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीची आजची स्थिती म्हणावी तशी चांगली नाही. कारण त्यांचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांची पक्ष निष्ठा क्षीण पडत चालली असून त्यांनी गुप्तपणे भाजपच्या लोकांशी हात मिळवणी केली आहे असा कोल्हापूरात बोभाटा आहे.  २००९ च्या विधानसभा निवडणुकीत खासदार महाडिक यांनी त्यांच्या सख्खा चुलत भावाचा भाजपकडून प्रचार केल्याचा आरोप त्याच्यावर  ठेवला जातो. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत सतेज उर्फ बंटी पाटील यांनी धनंजय महाडिक यांचा प्रचार केला होता तर   विधानसभेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांचा पराभव घडवून आणण्यात धनंजय महाडिक यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील आघाडीचे काम करतीलच याबद्दल खात्री देता येणार नाही. तसेच धनंजय महाडिक हे  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट सक्रिय झाल्यास भाजप मध्ये जाण्याची शक्यता आहे असे झाल्यास राष्ट्रवादीला कोल्हापूर मतदार संघात  तगडा उमेदवारच राहणार नाही.

सातारा लोकसभा मतदारसंघ
सातारा मतदार संघाचे खासदार कोण असा प्रश्न जरी विचारला तरी कुणीही सहज सांगेल एवढे त्या खासदारांचे नाव सुपरिचित आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या सातारा लोकसभा मतदार संघात तिसऱ्या वेळी  उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यासाठी पक्ष तयार नाही अशा बातम्या मागच्या काही महिन्यात आल्या आहेत. त्याबातम्यांना  पक्षाने कसलीही पुष्ठी दिली नसली तरी राष्ट्रवादीने उदयनराजेंना पक्षातून श्रीनिवास पाटील हे स्पर्धक तयार करण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदार संघात येत्या काळात होणाऱ्या राजकीय हालचाली मोठ्या रंजक असणार आहेत. तर उदयनराजेंना तिकीट नदिल्यास त्यांना भाजप आपला उमेदवार करू शकते असे हि मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

बारामती लोकसभा मतदार संघ
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून देशाच्या राजकारणात ओळखला जातो. या मतदार संघातून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे या लोकसभेवर सलग दोन वेळा निवडून गेल्या असून त्याअगोदर शरद पवार यांनी दीर्घ काळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गत निवडणूक मोदी लाटेची होती त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे मताधिक्य घेतले असून ९० हजार मतांनी सुप्रिया सुळे गेल्या वेळी लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. तरीहि येणारी निवडणूक सुप्रिया सुळे यांच्यासाठी सहज जिंकण्यासारखी असणार आहे कारण विरोधकांची या  मतदार संघात कसलीच हालचाल दिसून येत नाही तसेच गत वेळीचे सुप्रिया सुळे यांचे प्रतिस्पर्धक महादेव जानकर यांनी हि आपल्या बारामती मतदारसंघातील उमेदवारीच्या भूमिके बद्दल अद्याप मत व्यक्त केले नाही.  त्यामुळे येत्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित होईल असे राजकीय जाणकार सांगत आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघ
२००९ साली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मतदार संघातून निवडणूक लढून विक्रमी मताने विजयश्री खेचून आणली होती. त्या ठिकाणी २०१४ साली राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन उमेदवार सदाभाऊ खोत  यांनी चांगलीच घोडदौड घडवून आणली परंतु विजयदादांसारख्या मुरंबी आणि जेष्ठ नेत्याने सदाभाऊंचा मोदी लाटेत हि पराभव घडवून आणला. आता या मतदारसंघात राष्ट्रवादी विजयसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी देणार असल्याचे बोलले जाते आहे तर त्यांच्या विरोधात भाजप कोणाला उभे करणार हा  प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. त्यामुळे हि जागा राष्ट्रवादी जिंकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like