क्रेडिट कार्डबाबत तुमचा देखील ‘गैरसमज’ असेल तर करा दूर, होईल फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रेडिट कार्डबाबत अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत. पण जर योग्यप्रकारे ते वापरले तर क्रेडिट कार्ड तुमचे आर्थिक आरोग्य चांगले ठेवते. जर तुमच्याही मनात क्रेडिट कार्डबाबत गैरसमज असल्यास ते काढून टाका.

जाणून घेऊया क्रेडिट कार्डबाबत कोण-कोणते गैरसमज आहेत…
क्रेडिट मर्यादेतील वाढ टाळली पाहिजे
क्रेडिट कार्डधारक सामान्यत: आपली क्रेडिट मर्यादा वाढवणे टाळतात, कारण त्यांना भीती असते की यामुळे खर्च वाढेल आणि त्यानंतर कर्ज होईल. मात्र त्यांना हे समजत नाही की, जर त्याचा विवेकपूर्ण पद्धतीने वापर केला, तर एक वाढीव मर्यादा त्यांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासच मदत करत नाही, उलट त्वरित आर्थिक आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी देखील मदत करते.

क्रेडिट कार्ड तुमच्या आर्थिक आरोग्याला हानी पोहोचवू शकते
आपल्यापैकी बरेचजण कर्जाच्या जाळ्यात अडकण्याच्या भीतीने क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे टाळतात. मात्र बेजबाबदार उपयोग आपल्याला कर्जाच्या जाळ्यात अडकवू शकतो. म्हणून जर क्रेडिट योग्य प्रकारे वापरले, तर कधीही कर्जाच्या जाळ्यात अडकणार नाही. जे नवीन क्रेडिट कार्ड वापरत आहेत, ते चांगले क्रेडिट इतिहास तयार करु शकतात.

क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी जुने क्रेडिट कार्ड बंद केले पाहिजे
आपले विद्यमान क्रेडिट कार्ड बंद केल्यास बचत होऊ शकते, कारण यामुळे वार्षिक किंवा नवीन शुल्क कमी होईल. मात्र आपल्या गरजेनुसार कार्ड वापरा. याव्यतिरिक्त तुम्ही कोणतेही क्रेडिट कार्ड बंद केल्यास तुमची एकूण उपलब्ध क्रेडिट मर्यादा कमी होते.

वार्षिक शुल्क/ नवीन शुल्क असणारे क्रेडिट कार्ड चांगले आहेत
शून्य शुल्क असणारे क्रेडिट कार्ड बर्‍याच जणांना आवडते. उदाहरणार्थ, शॉपिंग कार्ड, किराणा सामान, लाईफ स्टाईल आणि इतर किरकोळ खर्चावर अधिक लाभ देतात, तर इंधन क्रेडिट कार्ड इंधन व्यवहारावर जास्त सूट आणि कॅशबॅक देतात. त्याचप्रमाणे ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड प्रवाशांना सातत्याने अधिक बक्षिसे, कॅशबॅक आणि प्रवास, हॉटेलमध्ये मुक्काम आणि जेवणावर सवलत देतात.