विशाखापट्टणममध्ये विषारी गॅसची गळती, लहान मुलासह तिघांचा मृत्यु

विशाखापट्टणम : वृत्त संस्था – आंध्र प्रदेशातील एल जी पॉलिमर या केमिकल कंपनीत विषारी रासायनिक गॅसची गळती झाली आहे. त्यामुळे आजू बाजूला राहणारे गावकरी तसे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहे. या घटनेत एका लहान मुलासह तिघांचा मृत्यु झाला आहे.

विशाखापट्टणमधील आर आर वेंकटापुरम गावात एल जी पॉलिमर या कंपनीत ही दुर्घटना घडली आहे. गॅस गळतीमुळे एक मुलगा, एक स्त्री व एका पुरुषाचा मृत्यु झाला आहे. एल जी पॉलिमर कंपनीच्या परिसरात राहणार्‍या लोकांच्या डोळ्यामध्ये जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या असून पोलीस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या आहेत.

या दुर्घटनेमुळे १ डिसेंबर १९८४ रोजी भोपाळमध्ये युनियन कार्बाइड या कंपनीत झालेल्या दुर्घटनेची आठवण झाली. या कंपनीत असाच पहाटेच्या सुमारास विषारी वायुची गळती होऊन शेकडो लोकांचा मृत्यु झाला होता़ तर, हजारो लोकांना आयुष्यभर अपंगत्व आले होते.