राज्यातील ४ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पोलीस अधिक्षक, पोलीस उपायुक्त, पोलीस उपअधिक्षक व सहायक पोलीस आयुक्त (निशस्त्र) संवर्गातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

गृह विभागाने शुक्रवारी बदल्याचे दिले आहेत. बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याची नावे आणि त्या पुढील कंसात कोठून कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे :- विजय व्यंकटराव कबाडे (समादेशक, भारत राखीव बटालीयन गट क्र. १३, वडसा-देसाईगंज नागपूर ( पदोन्नतीने पदस्थापनेच्या आदेशाधीन) ते अप्पर पोलीस अधिक्षक, बीड), विजय पांडूरंग लगारे (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय पोलीस अधिकारी, आष्टी उपविभाग, बीड), भास्कर अण्णा सावंत (पोलीस उपअधिक्षक (मुख्यालय), बीड ते उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड उपविभाग, बीड) आणि अमोल कोळी ( उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा उपविभाग, यवतमाळ ते उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा उपविभाग, चंद्रपूर).