राज्यातील ५ अप्पर अधीक्षक / पोलीस उपयुक्तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अप्पर पोलीस अधिक्षक व पोलीस उपायुक्त संवर्गातील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या नावासमोर कोठून कोठे बदली झाले ते कंसात लिहिले आहे ते पुढील प्रमाणे :-

श्रीकृष्ण कोकाटे (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते पोलीस उपायुक्त नागपूर शहर), प्रशांत खैरे (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर), वैभव कलुबर्मे ( अप्पर पोलीस अधिक्षक (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधिक्षक, लोहमार्ग औरंगाबाद), विजय पवार (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते अप्पर पोलीस अधिक्षक, भोकर, नांदेड) आणि जयश्री जाधव (अप्पर पोलीस अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नागपूर ते पोलीस अधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा, अप्पर पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई)