# Video : पुण्यातील नऱ्हे परिसरात एका तृतीय पंथीयांचा भर दिवसा नंगानाच

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील नऱ्हे परिसरात एका तृतीय पंथीयांनी भर दिवसा गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. एका दुकानदाराशी वाद घालत असताना त्यांनी अक्षरश: नंगानाच केला. पोलीस आल्यानंतरही त्यांना न जुमानता भर रस्त्यात अश्लील वर्तन करत कपडे काढून गोंधळ घातला. परंतु याप्रकऱणी पोलीसांत कुणीही तक्रार दिली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

नऱ्हे परिसरातील एका दुकानदारासोबत काही तृतीयपंथीयांचा वाद झाला. त्यानंतर त्यांनी चक्क कपडे काढून तेथे गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांना बोलविण्यात आले. परंतु पोलिसांनाही न जुमानता त्यांचा गोंधळ सुरु होता. पोलिसांसमोर त्यांनी दुकानावर दगडफेक केल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

त्यानंतर या तृतीयपंथीयांनी बराच वेळ येथे गोंधळ घातला. त्यांना पोलीस चौकीतही नेण्यात आले. परंतु याप्रकरणी कोणीही तक्रार न दिल्याने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले.