लोक जनशक्ती पार्टी सातारा यांच्या वतीने रामविलास पासवान यांना श्रध्दांजली

कुडाळ : पोलीसनामा ऑनलाइन –    दलित सेनेचे संस्थापक राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री रामविलासजी पासवान साहेब यांना आदरांजली वाहाण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते सदर प्रसंगी जिल्हाध्यक्ष विजयराव गायकवाड याच्या सह जिल्यातील अनेक नेत्यांनी शोकाकुल होत आदरांजली वाहिली यावेळेस बोलताना जिल्हाध्यक्ष विजयराव गायकवाड म्हणाले की बिहारच्या राजकारणातील मुरब्बी राजकारणी, लोकजनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं (8 ऑक्टोबर) दीर्घ आजाराने निधन झाले. यानंतर देशभरातून त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या जाण्याबद्दल शोकाकूल होत आदरांजली वाहिली आहे.

खऱ्या अर्थाने देशाच्या राजकारणात एक मोठी पोकळी तयार झाली आहे. ही पोकळी कधीही भरुन निघणार नाही. . रामविलास पासवान हे राजकारणात खूप कष्टाने पुढे आले. एक युवा नेते म्हणून त्यांनी आणीबाणी काळात होणारे अन्याय आणि अत्याचार यांना प्रखर विरोध केला. ते उत्कृष्ट संसदपटू आणि मंत्री होते. त्यांनी अनेक धोरणं तयार करताना महत्त्वाचं योगदान दिलं.

यावेळी सातारा जिल्ह्यातील ,जिल्हा सरचिटणीस अजितराव नलावडे,जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी निलेश भोसले,युथ जि.कार्याध्यक्ष करण गायकवाड,महिला जि.कार्याध्यक्ष पूजा बनसोडे,जि.उपाध्यक्ष प्रियांका भोसले, जि.उपाध्यक्ष यशवंत मतकर,आनंद जाधव,रवी भोसले कामगार आघाडी जि.उपाध्यक्ष हेमंत गायकवाड,खटाव ता.अध्यक्ष प्रशांत कीर्तिकर उपाध्यक्ष अजय सोनवणे, युथ खटाव ता.अध्यक्ष जीवन तडाके, जावळी ता.अध्यक्ष नारायण रोकडे, ता कार्याध्यक्ष चंद्रकांत गायकवाड,युथ ता.अध्यक्ष योगेश सोनवणे,माजी सरपंच सरताळे अशपाक शेख, या सहज शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.