ऐतिहासिक ! ‘तलाक-तलाक-तलाक’ कायमचा बंद, ‘तिहेरी तलाक’ विधेयकाला राज्यसभेत ‘मंजुरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत तीन तलाक विधेयकाला तिसऱ्यांदा मंजुरी मिळाल्यानंतर आज हे ऐतिहासिक विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले होते. या विधेयकावर राज्यसभेत झालेल्या मतदानात त्वरित तिहेरी तलाक विधेयकाला ऐतिहासिक मंजुरी मिळाली आहे. ९९ विरुद्ध ८४ इतक्या फरकाने हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. ‘मुस्लिम महिला (विवाह हक्कांचे संरक्षण) विधेयकाला’ राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यास या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. तत्काळ तोंडी तलाक आता या काद्यानुसार गुन्हा ठरणार आहे. या गुन्ह्यासाठी कायद्यात ३ वर्षाची तरतूद करण्यात आली आहे. या आधी या विधयकासंबंधी अध्यादेश लागू करण्यात आला होता. आता या विधेयकावर सविस्तर चर्चा, दुरुस्ती होऊन हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले.

मुस्लिम समाजासह संपूर्ण देशाचे या विधेयकाकडे लक्ष्य लागले होते. नुकतेच माहिती अधिकाराचे विधेयक राज्यसभेत पास करण्यात आले. भाजपला राज्यसभेत स्पष्ट बहुमत नसताना देखील माहिती अधिकाराचे विधेयक राज्यसभेत पास झाले. यामुळेच राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक सहज पास होण्याची शक्यता होती. अखेर हे ऐतिहासिक विधेयक राज्यसभेत पास झाले.

विधेयक सिलेक्ट समितीकडे पाठवण्यास भाजपने विरोध केला होता. अखेर १०० विरुद्ध ८४ मतांनी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. या महत्वपूर्ण विधेयकाच्या मतदानासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व प्रफुल्ल पटेल अनुपस्थित राहिले. शरद पवार हर्षवर्धन पाटील यांच्या पुस्तक प्रकाशनाला मुंबईत उपस्थित आहेत.

सोळाव्या लोकसभेतही सरकारने खालच्या सभागृहातून मुस्लिम महिला (विवाह हक्कांचे संरक्षण) विधेयक मंजूर केले होते, परंतु राज्यसभेत हे विधेयक बारगळले होते. राज्यसभेत सरकार हे विधेयक मंजूर करण्यावर पूर्ण भर देत आहे.

आरोग्यविषयक वृत्त