TRP घोटाळा : क्राइम ब्रँचविरुद्ध हंसाची हायकोर्टात याचिका

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : टीआरपी घोटाळा उघडकीस आणणाऱ्या हंसा रिसर्च ग्रुप प्रा. लि. ने मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग (क्राइम ब्रँच)चे तपास करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याची तक्रार करत हंसा रिसर्च व संचालक नरसिंम्हन के. स्वामी, सीईओ प्रवीण निझारा आणि उपमहाव्यवस्थापक नितीन देवकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती. याचिकेनुसार, हंसाच्या एका अहवालाचा आधार घेत अर्णब गोस्वामी यांनी आपण व आपली वृत्तवाहिनी या घोटाळ्यात सहभागी नसल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. मुंबई पोलीस आणि प्रसारमाध्यमांच्या काही लोकांच्या वादात आम्ही अडकलो आहोत. सचिन वाझे (सहायक पोलीस निरीक्षक) जबाब फिरवण्यासाठी छळवणूक करत आहेत. याचिककर्त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे, सहायक पोलीस आयुक्त आणि तपास अधिकारी शशांक सांडभोर, राज्य सरकार व सीबीआयला या याचिकेत प्रतिवादी केले आहे. हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची विनंती हंसाने याचिकेत केली आहे.