काय सांगता ! होय, तुर्की एअरलाइन्सनं चक्क एकाला प्लास्टिकमध्ये गुंडाळून पाठवलं ‘कॅमरून’मध्ये (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुर्की एअरलाइनचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसते की एक व्यक्तीला ज्याने खोटा पासपोर्ट सोबत बाळगला होता त्याला प्लास्टिकमध्ये लपेटून पुन्हा कॅमेरुनला डिपार्ट करण्यात आले. व्हिडिओमध्ये हा व्यक्ती ओरडताना दिसत आहे की हे लोक मला मारु इच्छित आहेत. शरीरावर घट्ट बांधलेल्या प्लॅस्टिकमुळे तो श्वास देखील घेऊ शकत नव्हता.

व्हिडिओमध्ये प्लास्टिकने बांधलेल्या व्यक्तीचे नाव इमॅन्युअल चेडो आहे असे सांगितले जात आहे. 47 वर्षीय इमॅन्युअल चेडो सांगतात की ते बिजनेस ट्रीपसाठी इस्तांबुलहून दुबई जाण्यासाठी निघाले होते. इस्तांबुल एअरपोर्टवर जेव्हा ते वावरत होते तेव्हा तेथील एका अधिकाऱ्याने त्यांना पकडले आणि सांगितले की तुमचा पासपोर्ट खोटा आहे. ज्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

इमॅन्युअल चेडो म्हणाले की त्यांनी तिकिट एका ट्रॅव्हल एजेंसीकडून घेतले होते. चेडो म्हणाले की अनेक पोलीस कर्मचाऱ्याने त्याला पकडून एका रुममध्ये नेले. तेथे पहिल्यापासूनच सामान पॅक करणारे प्लास्टिक पडले होते. त्या अधिकाऱ्याने माझे हात आणि पाय त्या प्लास्टिकने बांधले. चेडो म्हणाले की त्यांना दुबई जायचे होते परंतु त्यांना परत कॅमेरुनला पाठवण्यात आले. यावेळी त्यांचे मित्र देखील त्यांच्या सोबत होते, ज्यांनी हा व्हिडिओ शूट केला. चेडो म्हणाले की त्याने देखील सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला, ज्याने त्याला लवकर न्याय मिळू शकेल.