Bigg Boss 13 : सीजनच्या शेवटच्या विकेंड वॉरमध्ये होणार 2 एलिमिनेशन ; आरती सिंह, माहिरा शर्मा, शहनाज गिल धोक्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉसचा हा सीजन अनेक वेगवेगळ्या गेममुळे चर्चेत राहिला. सिद्धार्थ शुक्लाची पारस छाबडा, रश्मी देसाई, आसिम रियाज, शहनाज गिल यांच्यासोबत भांडणं झाली. रश्मी देसाई आणि देवोलीना यांनी वुमन कार्ड खेळलं. स्पर्धकांनी एकमेकांवर अनके वाईट शब्द वापरत कमेंट केल्या आहेत. नोकर, अशी तशी मुलगी, नशेखोर अशा शब्दांचाही वापर केला.

खासगी आयुष्य टीव्हीवर
नात्याबंद्दल चकित करणारे अनेक खासगी खुलासे टीव्हीवर करण्यात आले. अरहान खानचं लग्न, मुलं याचा खुलासा. आसिम रियाजच्या गर्लफ्रेंडबद्दलही खूप चर्चा झाली. हिमांशी खुराना आणि आसिम यांचा रोमांस जेव्हा वाढू लागला तेव्हा समजलं की आसिमची एक गर्लफ्रेंड आहे जिचं नाव श्रुती तुली आहे. पारस छाबडा-माहिरा शर्मा, आसिम-हिमांशी आणि सिद्धार्थ शुक्ला-शहनाज कौर गिल यांचा रोमांसही चाहते विसरू शकणार नाहीत.

सिद्धार्थ छाबडा टास्क जिंकून पारस छाबडाला वाचवेल.
असं म्हटलं जात आहे की, बिग बॉसच्या शेवटच्या वीकमधील वॉरमध्ये एक नाही तर दोन स्पर्धक शोमधून बाहेर पडणार आहेत. अद्याप तसा खुलासा मात्र झालेला नाही. सिद्धार्थ शुक्ला, आसिम रियाज आणि रश्मी देसाई नॉमिनेशन पासून सेफ आहेत. आजच्या एपिसोडमध्ये सिद्धार्थ शुक्ला टास्क जिंकून पारस छाबडाला वाचवेल. म्हणजेच आता तीन स्पर्धक नॉमिनेट आहेत. शहनाज गिल, आरती सिंह आणि माहिरा शर्मा. शहनाज गिलला जास्त सेफ म्हटलं जाऊ शकतं.