Jasmin Bhasin बिग बॉसच्या घरातून ‘बेघर’, ट्विटरवर 1.12 मिलियन ट्विटद्वारे परत आणण्याची केली जातेय मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जस्मीन भसीन (Jasmin Bhasin) आज बिग बॉस 14 ( Bigg Boss 14) मधून एलिमिनेट झाली. बिग बॉसच्या चाहत्यांना यामुळे धक्का बसला आहे आणि त्यांनी ट्विटरवर जस्मिन भसीनला परत आणण्याची मागणी केली आहे. बिग बॉसमध्ये असे फारच क्वचित होते जेव्हा आपल्या आवडत्या स्पर्धकाला आणण्यासाठी फॅन सोशल मीडियावर एक कॅम्पेन चालवतात आणि मोठ्या प्रमाणात व्होट करतात.

बिग बॉस 14 च्या सीजनमध्ये राहुल वैद्य, अली गोनी आणि राखी सावंत यांच्या संदर्भात बरेच ट्रेंड्स आले आहेत पण अलीकडील ट्रेन बिग बॉसमधून बेघर झालेल्या जस्मीन भसीनबद्दल आहे. जस्मीन भसीन आज बिग बॉसच्या घरातून बेघर होईल आणि चाहते यामुळे नाराज आहेत, यामुळे ते बिग बॉसच्या निर्मात्यांना तिला परत आणण्याची मागणी करीत आहेत. 1.12 मिलियन ट्विट लोकांनी केले आहे.

एका चाहत्याने लिहिले, ‘जस्मिन सर्वोत्कृष्ट आहे. तिला परत आणा. नाहीतर आम्ही हा कार्यक्रम पाहणार नाही. आम्ही जॅस्मिनबरोबर आहोत.’ दुसर्‍याने लिहिले, ‘आम्हाला माहित आहे की चाहते उत्कट आहेत आणि निर्माता रणनीतीद्वारे जस्मिन भसीनच्या चाहत्यांच्या भावनांशी खेळत आहोत, आम्ही चाहते एकत्र आहोत. जस्मिनला परत आणा. दरम्यान, जस्मीन भसीनला शोमधून बाहेर जाण्याची घोषणा करत असताना सलमान खान भावूक होतो, या आठवड्यात अभिनव शुक्ला, रुबीना दिलक, अली गोनी आणि जस्मिन भसीन यांना नॉमिनेट करण्यात आले. जस्मीन भसीनला घर सोडावं लागलंय, यामुळे सलमान खानही भावून होतो आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू येतात.

या वेळी बिग बॉसमध्ये अनेक ट्विस्ट्स आले आहेत. यापूर्वी रुबीना दिलक, अभिनव शुक्ला, एजाज खान आणि जस्मीन भसीन यांची अंतिम स्पर्धक म्हणून निवड झाली होती.परंतु त्यानंतर अनेक कलाकारांची स्पर्धेत एन्ट्री झाली आहे.