मुलांकडून टीव्ही, कॉम्प्यूटर, मोबाईलचा वापर चिंताजनक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जागतिक आरोग्य संघटनेनेच्या अहवालात लहान मुलांच्या आरोग्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे नमूद करण्यात आली आहेत. त्यानुसार मुलांचा हेल्दी विकास होण्यासाठी त्यांना इलेक्टॉनिक स्क्रिन्सपासून दूर ठेवावे. सध्या इलेक्टॉनिक गॅझेट्स आणि डिवाइस आवश्यक वाटत असले तरी मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवले पाहिजे. विशेषता ५ वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना या इलेक्टॉनिक गॅझेट्सचा वापर करू देऊ नका.

जागतिक आरोग्य संघटनेच्य अहवालानुसार एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या नवजात बालकांना स्क्रिनसमोर बसू देऊ नये. त्यांना दिवसभरात १ तासापेक्षा जास्त स्टॉलर्स, हाय-चेयर्स किंवा स्टॅप ऑन कॅरियर्समध्ये ठेवू नये. एक वर्षापर्यंतची मुलांनी दिवसभर हालचाल केल्यास खेळल्यास त्यांच्या आरोग्यासाठी ते उपयोगी आहे. १ ते २ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी काही मिनिटांचाच स्क्रिन टाइम पुरेसा असतो. तसेच कमीत कमी ३ तासांची शारीरीक हालचाल या मुलांसाठी अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे त्यांचा शारीरीक विकास चांगला होतो.

३ ते ४ वर्षांपर्यंतच्या मुलांनी दिवसभरामध्ये १ तासापेक्षा जास्त स्क्रिनसमोर बसून नये. टीव्ही, स्मार्टफोन आणि अन्य गॅझेटच्या अतिवापराने मुलांमध्ये विविध समस्या निर्माण होतात. या वयाच्या मुलांना दिवसात कमीत कमी ३ ते ४ तासांची शारीरीक हालचाल आवश्यक आहे.५ वर्षांच्या मुलांनी जर जास्तीत जास्त वेळ स्क्रिनसमोर घालवला तर अशा मुलांची राहणीमान निष्क्रिय आणि गतिहीन होते. ज्यामुळे त्यांची अ‍ॅक्टिव्हिटी लेव्हल कमी होते आणि झोप येत नाही. यामुळे अनिद्रेच्या समस्या उद्भवतात. तसेच या मुलांन नंतर लठ्ठपणा आणि त्यासंबंधीत आजार होण्याची शक्यता बळावते.

You might also like