TV अभिनेत्री लिना आचार्य यांचं निधन, किडनी फेल झाल्यामुळं गेला जीव

मुंबई – टीव्ही अभिनेत्री लीना आचार्य यांचे शनिवारी (21 नोव्हेंबर) निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण असे सांगितले जात आहे की त्यांच्या किडनी निकामी झाल्या होत्या. लीना आचार्य गेल्या दीड वर्षांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होत्या. काही काळापूर्वीच त्यांच्या आईने तिची किडनी लीनाला दान केली होती, परंतु त्यानंतरही त्यांचा जीव वाचू शकला नाही. लीनाला दिल्लीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले व तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लीना आचार्य ‘सेठ जी’, ‘आप के आ जाने से’, ‘मेरी हानीकारक बिवी’ अशा अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी राणी मुखर्जी यांच्या ‘हिचकी’ चित्रपटासह अनेक चित्रपट आणि वेब मालिकांमध्येही काम केले आहे. लीनाच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण उद्योगात शोककळा पसरली आहे. लीनाच्या सोबत काम केलेल्या कलाकारांनी तिच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
leena acharya died

यापूर्वी अशी बातमी आली होती की लीना आचार्य यांचे कोरोना विषाणूमुळे निधन झाले, परंतु नंतर हे स्पष्ट झाले की किडनी निकामी झाल्यामुळे लीना आचार्य यांचा मृत्यू झाल्याचे समजते. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम रोहन मेहराने इंस्टाग्राम स्टोरीवर लीना आचार्यची आठवण सांगणारा एक फोटो शेअर केला आहे, त्यासह त्याने लीना आचार्य यांना श्रद्धांजली वाहिली. रोहन लिहितो, ‘मॅडम, तुमच्या आत्म्याला शांती मिळो. मागील वर्षी आपण यावेळी क्लास ऑफ 2020 च्या शूटींगसाठी निघालो होतो. तुमची खूप आठवण येईल.’

You might also like