Twitter Data Leak | 40 कोटी यूजर्सचा डाटा लीक! सलमान खान ते NASA पर्यंतच्या अकाउंटमध्ये घुसखोरीचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Twitter Data Leak | मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरच्या सुमारे ४० कोटी यूजर्सचा डेटा चोरीला गेला आहे. हा डेटा हॅकरने चोरला असून डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. चोरीला गेलेल्या डेटामध्ये वापरकर्त्यांची नावे, ईमेल आयडी, फॉलोअर्सची संख्या आणि वापरकर्त्यांचे फोन नंबर देखील आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, डेटा लीकमध्ये भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि यूएस स्पेस एजन्सी नासा यांच्या खात्यांचा देखील डेटा आहे. याआधी ट्विटरच्या सुमारे ५.४ मिलियन म्हणजे ५४ लाख यूजर्सचा पर्सनल डेटा लीक झाला होता. (Twitter Data Leak)

 

मीडिया रिपोर्टनुसार, हॅकर्सनी सलमान खान, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, स्पेस एक्स आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) इत्यादीसारख्या हाय प्रोफाइल लोकांच्या अकाउंटचा डेटा देखील चोरला आहे. हॅकरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ट्विटर किंवा एलोन मस्क, जर तुम्ही ही पोस्ट वाचत असाल, तर तुम्हाला आधीच ५.४ कोटीपेक्षा जास्त यूजर्सचा डेटा लीक झाल्यास GDPR दंडाचा धोका आहे. आता ४० कोटी यूजर्सचा डेटा लीक झाल्याने दंडाबाबत विचार करा. (Twitter Data Leak)

 

माजी सुरक्षा प्रमुखांनी दिला होता इशारा
हॅकरने चोरलेला डेटा मध्यस्थामार्फत विकण्याची ऑफर दिली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की API मध्ये त्रुटी असल्यामुळे कोणताही डेटा लीक होऊ शकतो. नुकतेच ट्विटरचे माजी सुरक्षा प्रमुख योएल रॉथ यांनी मस्क यांच्या नेतृत्वाखाली ट्विटरला असुरक्षित म्हटले होते आणि यूजर्सच्या डेटाला सुद्धा धोका असल्याचे म्हटले होते. सुरक्षेची काळजी घेण्यासाठी कंपनीकडे पुरेसे कर्मचारी नसल्याचे त्यांनी सांगितले होते. कंपनीने आपल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, त्यामुळे युजर्सच्या डेटाचा धोकाही वाढू शकतो.

५.४ मिलियन यूजर्सचा डेटा लीक
यापूर्वी, ट्विटरच्या सुमारे ५.४ मिलियन म्हणजे ५४ लाख यूजर्सचा वैयक्तिक डेटा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता.
री-स्टोअर प्रायव्हसीच्या अहवालानुसार, या वर्षी २०२२ मध्ये यूजर्सचा डेटा हॅक झाला होता. हा डेटा लीक त्याच बगमुळे झाला होता ज्यासाठी ट्विटरने बग बाउंट प्रोग्राम अंतर्गत zhirinovskiy नावाच्या हॅकरला ५,०४० डॉलर म्हणजेच ४,०२,३८६ रुपये दिले होते. हॅकरने हा डेटा हॅकर्स फोरमवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला होता. या डेटा लीकमध्ये युजर्सच्या पासवर्डचा समावेश नव्हता.

 

Web Title :- Twitter Data Leak | twitter data leak of 400 million users including salman khan and nasa account

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Solapur Police | कर्तव्य सोडून पोलिसाचा भरचौकात डान्स, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचारी ताब्यात

Tunisha Sharma Death | तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; मृत्यूचे कारण आले समोर

MP Sanjay Raut | ‘… त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील’, शिंदे गटाच्या आमदाराचा टोला

Gulabrao Patil | मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपावरुन गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंवर संतापले, म्हणाले -‘आधी जावयाला जेल बाहेर काढा आणि मग…’