भारतासहित २१ देशांत ‘ट्विटर’ डाउन, काही काळानंतर सेवा पूर्ववत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावरील महत्त्वाची आणि लोकप्रिय नेटवर्किंग साइट ट्विटर आज परत एकदा काही काळ डाऊन झाल्याचे दिसून आले. त्यामुळे काही काळ जगभरातील वापरकर्त्यांना ट्विट करणे शक्य होत नव्हते, त्यामुळे नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला. नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ट्विटरवर सायंकाळी ७:३० पासून हा प्रकार येत आहे आणि नंतर हळूहळू बहुतेक लोकांना त्यांचे ट्विटर चालवता येत नव्हते. त्यानंतर ट्विटरची सेवा पूर्ववत होण्यासाठी जवळपास अर्ध्या तासाहून अधिक अवधी लागला.

का महत्वाचे आहे ट्विटर :
आजकाल जगभरातील अनेक अधिकृत निर्णय ट्विटर द्वारे जाहीर केले जातात आणि लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले जातात. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ट्विटर हे एक उत्तम साधन असल्याने लोकांकडून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांचे निवारण करणे यासाठी देखील शासनाचे काही प्रशासकीय विभाग ट्विटरचा प्रभावी यंत्रणा म्हणून वापर करत असतात.

नेमकं काय झालं :
आज सायंकाळी ७:३० च्या सुमारास अचानक ट्विटर डाउन झाले आहे. त्यामुळे तेथे ट्विट किंवा रिट्विट करता येत नव्हते. ट्विटर उघडल्यानंतर ‘cannot retrieve tweets at the moment’ आणि ‘something went wrong’ असे मेसेज दाखवले जात होते. त्यामुळे नेटकरी कमालीचे वैतागले होते. भारत, जपान, ब्राझील, कॅनडा, यूके आणि अमेरिकेसह जगभरातील २१ देशात ट्विटर डाउन झाले होते. अशाप्रकारे ट्विटर हे पहिल्यांदा डाउन झालेले नाही. याआधीही ट्विटरवर यासारखी समस्या उद्धभवली होती. नुकतीच ११ जुलै रोजी देखील ट्विटरची सेवा १ तासासाठी बंद झाली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like