तलवारीने दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील संजयनगर परिसरात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना रविवारी अटक करण्यात आली. बाबासाहेब गौतम कांबळे (वय 35, रा. वानलेसवाडी), बाबासाहेब ऊर्फ संतोष कोंडीबा मगदूम (वय 30, रा. वारणाली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी शस्त्रे घेऊन दहशत माजवणाऱ्या वर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे शहरात गस्त घालत होते. संजयनगर येथील एका मंगल कार्यालय जवळ दोघे हातात तलवार घेऊन दहशत माजवत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने तातडीने दोघांना ताब्यात घेऊन तलवार जप्त केली. निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?