पुण्यात ‘बाबूगिरी’ !191 रूग्ण प्रकरणे प्रलंबित ठेवणारे 2 लिपिक पोलिस कर्मचारी निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संक्रमणादरम्यान पोलिस रस्त्यावर गस्त घालत असताना कार्यालयातील लिपिक मात्र बेजबाबदारपणे, निष्काळजीपणाने कर्तव्य पार पाडत होते. अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी १९१ पोलिसांची रुग्ण प्रकरणे प्रलंबित ठेवल्यामुळे दोन लिपिकांना निलंबित केले आहे. वरिष्ठश्रेणी लिपिक सतीश मुरलीधर सातपुते आणि कनिष्ठश्रेणी लिपिक आकाश रामचंद्र शिंदे अशी पोलीस दलातील या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्यासाठी पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी दिवसरात्र रस्त्यावर बंदोबस्ताचे काम करत होते. तसेच आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वांधिक कर्तव्यावर असलेल्या १० हजार २६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १०८ पोलिसांचा मृत्यू झाला, असताना कार्यलयात काम करणारे लिपिक मात्र त्यांना सांगितलेल्या कामात बेजबाबदार, बेफिकीर, सचोटी, कर्तव्यपारायणता, हलगर्जीपणा करत होते. सातपुते यांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक पदाचे ६१ व पोलीस हवालदार पदाचे ५७ असे ११८ रुग्णनिवेदन प्रकरणे प्रलंबित ठेवले आहेत. तर आकाशी शिंदे यांनी त्यांच्याकडे आलेले ७३ रुग्ण निवेदन प्रकरणे प्रलंबित ठेवले.

आपल्याकडे असलेली काम प्रलंबित असताना सुद्धा ते तीन दिवस कोणालाही काही न सांगता गैरहजर राहिले. तसेच २३ जुलैपासून विनापरवाना गैरहजर होते. तेव्हा प्राथमिक चौकशी केली असता त्यात ते कर्तव्यात कसुरी केल्याचे आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.