‘त्या’ ११ गावांमधून दोन नगरसेवक निवडणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. तूर्तास या ११ गावांची लोकसंख्या गृहीत धरून पुढील साधारण साडेतीन वर्षांसाठी दोन सदस्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी ही ११ गावे मिळून दोन जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी प्रारूप द्विसदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b6a9715e-c973-11e8-93ab-e97834ee5b46′]

महापालिका हद्दीवरील ११ गावांचा मागीलवर्षी डिसेंबर महिन्यात पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्यात आला होता. दरम्यान मागील वर्षीच अर्थात फेब्रुवारी २०१७ मध्ये पुणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होउन नवीन महापालिका अस्तित्वात आली. त्यामुळे पुढील निवडणुकीचा चार वर्षांचा कालावधी लक्षात घेता या ११ गावांमध्ये विकास कामे करण्यासाठी सर्वस्वी महापालिकेच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेने पाठविलेल्या अहवालानंतर नवीन ११ गावांमध्ये निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पवारांच्या नावाची चर्चा थांबली पण पुण्यात पुढे काय ?

या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून काल राज्य निवडणुक आयोगाने महापालिकेला पत्र पाठवून ११ गावे मिळून एक द्विसदस्यीय प्रारुप प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. या ११ गावांमधील तसेच पुणे महापालिकेच्या एकूण लोकसंख्येच्या जातीनिहाय आकडेवारीवरून एक जागा सर्वसाधारण एक जागा सर्वसाधारण गटासाठी तर एक जागा सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने आज प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम प्रसिद्ध केला असून या प्रक्रियेसाठी अधिकार्‍यांची नियुक्तीही केली आहे. आज प्रारुप प्रभाग रचनेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान यावर हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. १७ ऑक्टोबरला या हरकतींवर सुनावणी होईल. यानंतर २० ऑक्टोबरला अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. यानंतर निवडणूक आयोगाच्या पुढील आदेशानुसार निवडणुक घेण्यात येणार आहे.

[amazon_link asins=’B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca5f861e-c973-11e8-bd0b-03c0729b4393′]

उमेदवारांसाठी ठरणार डोकेदुखी

महापालिकेच्या हद्दीमध्ये देवाची उरूळी, फुरसुंगी या दोन गावांसह लोहगाव, साडे सतरानळी, केशवनगर, धायरी, आंबेगाव, बावधन, शिवणे, उत्तमनगर, उंड्री या गावांतील उर्वरीत भागाचा समावेश झाला आहे. भौगोलिकदृष्टया ही सर्व गावे पुणे शहराच्या पुर्व भागापासून दक्षिण आणि पश्‍चिम भागापर्यंत पसरलेली आहेत. या सर्व गावांची एकत्रित मतदार संख्या दीड लाखाच्या आसपास आहे. तर लोकसंख्या सुमारे दोन लाख आहे. एवढ्या मोठ्या भौगोलीक भागासाठी केवळ एकच प्रभाग आणि दोन सदस्य निवडले जाणार असल्याने अगदी प्रचारापासून निवडूण आलेल्या विकास कामांचे नियोजन हा संबधित उमेदवारांसाठी डोकेदुखीचे ठरणार असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.