‘त्या’ आमदाराच्या कारने दोघांना चिरडले

बेंगळुरु : वृत्तसंस्था – कर्नाटकचे चिकमंगलूर विधानसभा मतदार संघाचे आमदार सी.टी. रवी यांच्या कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर कारमधील रवी यांच्यासह चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात कुनिगल या ठिकाणी घडला.

सोमवारी रात्री कुनिगल येथील कोल्लूर मंदीरात आमदार सी.टी.रवी हे देवदर्शनासाठी आले होते. देवदर्शन करुन परतताना त्यांच्या कारचा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच यामध्ये कारमधील रवी यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

पश्‍चिम महाराष्ट्र : 5 जिल्ह्यातील 22 पीआय, 12 एपीआयच्या बदल्या 
किर्ती आझाद यांची ‘घरवापसी’ 
अमेरिकेतून नागराज मंजुळेंची शिवरायांना मानवंदना 
#PulwamaTerrorAttacks : पाकिस्तान पंतप्रधानाची भारताला उघड धमकी 
अ‍ॅम्ब्युलन्स आणि कारचा भीषण अपघात ; ७ ठार