home page top 1

गुलटेकडीत २ लाख ७५ हजार रुपयांची रोकड पकडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संभावित पैसे वाटप, साहित्य वाटप, दारू वाटप इत्यादींची तपासणी करण्यासाठी शहरात पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मागील आठवड्यात २० लाखांची रोकड पकडल्यानंतर स्थीर स्थावर पथक क्र. १ ने गुलटेकडी येथे सॅलसबरी पार्कजवळ वाहनांची तपासणी करताना एका कारमधून सोमवारी रात्री पावणेतीन लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही रोकड एका व्यावसायिकाची असून ती घरी घेऊन जात असल्याचे व्यावसायिकाने सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या स्थिर स्थावर पथक क्र. १ चे अधिकारी सचिन प्रकाश पवार, आरोग्य निरीक्षक, पुणे महानगरपालिका तथा इलेक्शन मृजिस्ट्रेट हे त्यांच्या सहकाऱ्यांसह निवडणूक काळात होणाऱ्या संभावित पैसे, साहित्य, दारू वाटपासंदर्भात रात्री गुलटेकडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी सॅलेसबरी पार्क येथील पुनावाला गार्डनजवळ त्यांनी एका वाहनाचा संशय आल्याने तपासणी केली. त्यावेळी कारमध्ये २ लाख ७५ हजार रुपयांची रोकड आढळून आली. त्यानंतर प्रकाश पवार यांनी भरारी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत देडगे यांना माहिती दिली. त्यांचे पथक तेथे दाखल झाले. महेंद्र मांगीलाल कावेडीया (वय. ५४ वर्षे, रा. न्यू मोदीखाना कॅम्प) यांची ही रक्कम असल्याचे समजले. ती रक्कम लोकसभा आचारसंहितेच्या कार्यवाहीनुसार पंचनामा करून जप्त करण्यात आली.

कावेडीया हे व्यावसायिक आहेत. त्यांच्या व्यवसायाची जमा झालेली रक्कम ते घरी घेऊन जात होते. त्यावेळी ती पकडण्यात आली आहे. निवडणूक खर्च समन्वय अधिकारी आणि आयकर विभागाकडे या रकमेबाबतचा तपशील सादर केल्यानंतर ती त्यांना परत मिळू शकेल.

Loading...
You might also like