पुण्यात लॉजमालकाच्या डोक्यात हातोड्याने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ग्राहक म्हणून आलेल्या दोघांचे लॉजमालकाशी किरकोळ वाद झाल्यानंतर त्यांनी त्याच्या डोक्यात हातोड्याने वार करून पिस्तूलाचा धाक दाखवत पळ काढला. हा प्रकार पुण्यातील लष्कर परिसरात बुधवारी दुपारी घडला.

याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर रविंद्र अग्रवाल (७२) हे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र अग्रवाल यांचे कॅम्प परिसरात राजतिलक लॉज आहे. आज दुपारी दोन व्यक्ती त्यांच्या लॉजमध्ये आल्या. हे दोघेही पूर्वीचे ग्राहक असल्याने अग्रवाल यांनी त्यांच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. गप्पा मारता मारता त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि त्यातील एकाने अग्रवाल यांच्या डोक्यात तीन वेळा हातोड्याने वार केले. तर दुसऱ्याने व्यक्तीने अग्रवाल यांना पिस्तूलाचा धाक दाखवून नंतर तेथून पळ काढला. यात गंभीर जखमी झालेल्या अग्रवाल यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. लष्कर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असून त्याआधारे दोघांचा शोध घेतला जात आहे.

Loading...
You might also like