बीड : ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा जगीच मृत्यू

केज (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी जात असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास केज शहरातील जुन्या पोलीस ठाण्यासमोर झाला. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती.

प्रकाश पिराजी कोमटे (वय-26 रा. मरडसगाव ता. गंगाखेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विलास मोरे (रा. लोणार, ता. कंधार) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दोघेजण चिंचोली फाटा येथे असलेल्या खडी क्रशरवर काम कर होते. मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश आणि विलास हे दोघे दुचाकीवरून (एमएच.२६ बी.एम. १४२२) अंबेजोगाई रोडवरील पेट्रोल पंपावर चालले होते. त्याचवेळी ट्रक (एमएच १६ एवाय ५८५९) त्याच दिशेने जात होता.

दरम्यान, दुचाकी घसरल्याने दुचाकी चालवणारा विलास मोरे हा दूर फेकला गेला तर मागे बसलेला प्रकाश ट्रकच्या चाकाखाली आला. ट्रकचे चाक प्रकाशच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. जखमी विलास मोरे याला पत्रकार संघाचे अध्यक्ष सय्यद माजेत, पोलीस कॉन्स्टेबल नामदास, वाहतूक पोलीस करवंदे तसेच रजणित खोडसे, अक्षय गिते याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like