पुणे-नाशिक महामार्गावर विचित्र अपघातात 2 तरुणांचा मृत्यू

पुणे/मंचर : पोलीसनामा ऑनलाइन – डंपर आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोन तरूण एसटीच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा विचित्र अपघात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळील अवसरी फाटा येथे आज (मंगळवारी) झाला. विरुद्ध दिशेने आलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिली. त्याचवेळी पाठिमागून येणाऱ्या एसटीच्या चाकाखाली गेल्यामुळे दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

संकेत आनंदराव भोईटे (वय-23) आणि ओंकार भीमराव भोईटे (वय-20 दोघे रा. आरडगाव ता. फलटण, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणाची नावे आहेत. संकेतचा जागीच मृत्यू झाला तर ओंकारला रुग्णालयात नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, संकेत आणि ओंकार हे दोघे दुचाकीवरून (एमएच 14 एफए 5734) मंचरच्या दिशेने जात होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या डंपरची (एमएच 12 आरएन 7169) धडक दोघांच्या दुचाकीला समोरून बसली.

त्याचवेळी मंचरच्या बाजूने नाशिक मलकापूर एसटी (एमएच 11 टी 9286) येत होती. डंपरची धडक बसल्याने दोघे दुचाकीवरून उडून एसटीच्या चाकाखाली गेले. त्यामध्ये संकेतचा जागीच तर ओंकारला जखमी अवस्थेत मंचरला नेत असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला. मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/