U19 Womens World Cup | सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पहिल्याच अंडर 19 महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये (U19 Womens World Cup) भारतीय महिला संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. शफाली वर्मा या संघाचे नेतृत्व करत आहे. भारताच्या पार्शवी चोप्राच्या भेदक मारा आणि श्वेता सेहरावतच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर (U19 Womens World Cup) मात करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 107 धावा केल्या. भारताने हे आव्हान फक्त 14.2 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात पार केले.

 

दुसऱ्या सेमी फायनल सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडणार आहे. या दोन्ही संघात जो जिंकेल तो फायनलमध्ये भारताबरोबर खेळेल. आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगीरी करत न्यूझीलंडला 107 धावात रोखलं. न्यूझीलंडकडून चर्जिया प्लीमरने 35 तर एजाबेल गेजने 26 धावा केल्या. या दोघांशिवाय कोणालाही मोठी धावसंख्या करता आलेली नाही. तर भारताकडून पार्शवीने 4 षटकात 20 धावा देत 3 विकेट घेतल्या. (U19 Womens World Cup)

यानंतर प्रत्युत्तरादाखल श्वेता सेहरावतने जबरदस्त अर्धशतकी खेळी केली. शफाली वर्मा बाद झाल्यानंतर संयमी खेळी करत श्वेताने भारताला विजयापर्यंत पोहोचवलं.
तिने 45 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. आतपर्यंत भारताने या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
भारताने या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, युएई आणि स्कॉटलंडचा पराभव करत सुपर सिक्समध्ये स्थान मिळवले.
मात्र सुपर सिक्स फेरीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत व्हावं लागले.
यानंतर भारताने जोरदार पुनरागमन करत श्रीलंकेविरुद्धचा सामना एकतर्फी जिंकत सेमी फायनलमध्ये धडक मारली होती.
आता भारत अंडर 19 महिला टी20 वर्ल्ड कप जिंकतो कि नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- U19 Womens World Cup | under 19 womens world cup india reached in final after beat new zealand by 8 wicketes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | …काका कानाला बोटे लावा; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकोप्यावर बोलताना जयंत पाटील यांचा संजय पाटील यांना टोला

Advay Hire | शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले…

CM Eknath Shinde | आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा राखता आल्या तरी पुरेसं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे