UAE चं पाहिलं मार्स मिशन ‘होप प्रोब’ जपानच्या ‘तनेगशिमा’ स्पेस सेंटर मधून झालं लॉन्च, UN नं केली ‘प्रशंसा’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : संयुक्त अरब अमिराती (युएई) चे पहिले मंगळ मिशन होप प्रोब आज जपानमधील तनेगाशिमा स्पेस सेंटरवरून अवकाशात गेले. युएईच्या अंतराळ संस्थेचे म्हणणे आहे की होप प्रोब योग्यप्रकारे कार्य करत आहे आणि प्रक्षेपणपासूनच संकेत पाठवत आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघाने (यूएन) यूएईच्या या मोहिमेचे कौतुक करत म्हटले आहे की युएईची मंगळ मोहीम संपूर्ण जगासाठी योगदान आहे.

संयुक्त राष्ट्राच्या ऑफिस ऑफ स्पेस अफेयर्सच्या संचालक सिमोनिता डी पिप्पो म्हणाल्या की युएई नेहमी भविष्याप्रती तत्पर असतो, हा आमचा अद्भुत साथीदार आहे. व्हिएन्ना येथून स्काइपवर दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले की, ‘मी होप प्रोब बद्दल उत्सुक आहे.’

यावरून हे सूचित होते की युएई वास्तवात अंतराळ क्षेत्रातील एक महत्त्वाचा खेळाडू होत आहे. होप प्रोबचे लॉन्चिंग करणाऱ्या डी पिप्पो यांनी सांगितले की, ही गोष्ट अत्यंत कौतुकास्पद आहे, काही वर्षांपूर्वी ज्या देशाकडे अंतराळ कार्यक्रम किंवा अवकाश एजन्सी नव्हती, तो देश आता मंगळावर तपासणी करण्यास सक्षम आहे.