Uday Samant | राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपासुन सुरु होणार – उदय सामंत यांची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी राज्यातील महाविद्यालये (Colleges) सुरु करण्याबाबत एक महत्वपुर्ण घोषणा केली आहे. नुकतंच 10 वी आणि 12 वीचा निकाल लागला. तसेच पुढील प्रवेश देखील सुरु झाले आहेत. या दरम्यान आता कॉलेज/महाविद्यालये सुरु करण्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव घटताना दिसत आहे. या पार्श्वभुमीवर यंदाचं शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली होती. यावरुन आता येणा-या 1 नोव्हेंबरपासुन राज्यात कॉलेज सुरु करण्याचा विचार असल्याचं मंत्री उदय सांमत म्हणाले. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

त्यावेळी बोलताना उदय सांंमत म्हणाले (Uday Samant) की, राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी कॉलेज सुरु होतील असं नाही. त्या भागातील कोरोनाची स्थिती काय आहे. यावर हा निर्णय घेतला जाईल. तसेच, नवीन शैक्षणिक वर्ष कसं असावं याबाबत माहिती दिली जाईल” असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. दरम्यान, कोरोनाचे सर्व नियम पाळूनच राज्यात कॉलेजेस सुरु केले जाणार आहेत.

दरम्यान, मुख्यतः म्हणजे, कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय जरी घेण्यात आलं असला तरी राज्यातील सर्व महाविद्यालयीन युवकांचे लसीकरण झालं असणं महत्त्वाचं आहे. कोरोनाच्या प्रादर्भाव रोखण्यासाठी पूर्ण लसीकरण महत्त्वाचं आहे. म्हणुन महाविद्यालयीन तरुणांचं किती टक्के लसीकरण झाले हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे.

हे देखील वाचा

Rain in Maharashtra | राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; पुण्यासह ‘या’ 18 जिल्ह्यांना हाय अलर्ट

Maharashtra Lockdown | …तर महाराष्ट्रात लॉकडाऊन निश्चित?; सध्या दैनंदिन बाधितांची संख्या 4 ते 5 हजार

Sharad Pawar | …यापुढे सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित रहाणार नाही – शरद पवार (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Uday Samant | colleges may reopen in maharashtra on 1st november 2021 said minister of higher education

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update