Uday Samant On Mahavikas Aghadi | भविष्यात उबाठा काँग्रेसमय होऊन पटोलेंच्या निर्देशाने काम करेल, आघाडीचा मेळावा म्हणजे फ्लॉप शो, सामंत यांची टीका

मुंबई : Uday Samant On Mahavikas Aghadi | कालच्या इंडिया आघाडीच्या (INDIA Aghadi) मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सूचना केल्यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) फक्त पाच मिनिटे भाषण करण्याची संधी मिळाली, ही अतिशय दुःखद गोष्ट आहे. त्यामुळे भविष्यात उबाठा काँग्रेसमय होऊन नाना पटोले यांच्या निर्देशानुसार काम करेल अशी शक्यता आहे, अशी खोचक टीका शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) नेते उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

उदय सामंत म्हणाले, हा मेळावा षण्मुखानंद सभागृहात घेतला असता तरी चालले असते. एवढा खर्च करण्याची आवश्यकता नव्हती. २५ पक्षांनी एकत्र सभा घेऊन सुद्धा मैदान भरले नाही, हा प्रकार नैराश्यपूर्ण होता. इंडिया आघाडीचा मेळावा म्हणजे फ्लॉप शो होता.

उदय सामंत म्हणाले, बाळासाहेब असताना शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या सभेला मैदान आणि आजूबाजूचा परिसर गर्दीने ओसंडून जायचा. मात्र कालच्या मेळाव्याला एवढी कमी गर्दी होती की, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हे काय सुरु आहे, असे प्रश्नचिन्ह होते. यापेक्षा जास्त गर्दी महायुतीच्या तालुक्यांच्या सभेला असते.

उदय सामंत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे फक्त एकदा नाव उच्चारले. इतर पक्षाच्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या नावाचा उच्चार देखील केला नाही.
अगदी राहुल गांधी यांनी देखील बाळासाहेबांचे नाव घेतले नाही.
इंडिया आघाडीच्या नेत्यांचे भाषण सुरु असताना हे भाषण कशासाठी सुरु आहे, त्याचा अर्थ सुद्धा कित्येक कार्यकत्र्यांना
उमगत नव्हता. भाषण करणाऱ्या व्यक्तीला तरी त्या भाषणाचा अर्थ समजला का, हा देखील संशोधनाचा विषय आहे.

उदय सामंत म्हणाले, कालच्या भाषणाची सुरुवातही तमाम हिंदू बंधू, भगिनींनो आणि मातांनो अशी का झाली नाही.
राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी गेले नाहीत?

काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्यानंतर देशात जे वातावरण तयार झाले आहे, त्याचे समर्थन कालच्या मेळाव्यात
राहुल गांधींसोबत बसलेले सर्वपक्षीय नेते करणार का? याची उत्तरे मला उबाठा प्रमुखांकडून अपेक्षित आहेत,
असे सामंत म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | लाच प्रकरणात देवेंद्र खिंवसरा यांना अटकपूर्व जामीन

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)

Pimpri Crime Branch Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार पीडित मुलींची सुटका

Nana Patole On Election Commission | नाना पटोलेंचा आयोगाला सवाल, गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणूका, मग महाराष्ट्रात…

Dacoity With Arms In Shirur Pune | शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी