Uday Samant On Uddhav Thackeray | उदय सामंतांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, ”काँग्रेसच्या कुबड्या घेतलेल्यांनी लाथ घालायची भाषा करु नये”

रत्नागिरी : शिवसेना (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात त्यांनी उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर घणाघती टीका केली होती. या टीकेला सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जे काँग्रेसच्या (Congress) कुबड्या घेऊन नाचत आहेत, त्यांनी कोणालाही लाथ घालायची भाषा करु नये, असे सामंत (Uday Samant On Uddhav Thackeray) यांनी म्हटले. ते ऑनालाईन पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले, रत्नागिरीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा आणि विठ्ठल मूर्तीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आपण केला. या दोन कार्यक्रमांच्या मधे एक करमणुकीचाही कार्यक्रम होता, असा चिमटा सामंत यांनी ठाकरे यांच्या सभेबद्दल काढला.

उदय सामंत म्हणाले, आधी जे शिवाजी पार्कवर सभा घेत होते, त्यांच्यावर आता रस्त्यावर, बोळात, चावडीवर सभा
घेण्याची वेळ आली आहे. ही सभा म्हणजे टोमणे आणि कुटुंबाच्या बदनामीचा कार्यक्रम होता.

उदय सामंत म्हणाले, आपण गद्दाराच्या पेकाटात लाभ घालायला आलो आहोत, असे पक्षप्रमुख म्हणाले.
मात्र काँग्रेसच्या कुबड्या घेऊन नाचणाऱ्यांनी लाथ घालायची भाषा करु नये.

उदय सामंत म्हणाले, गद्दारांना गाडायचे आहे, या उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याशी मी पूर्ण सहमत आहे.
बाळासाहेब सांगायचे की मी शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही. अशी वेळ आली तर पक्ष बंद करू.
पण आता ठाकरे शिवसेना काँग्रेससोबत गेली आहे. ही खरी गद्दारी आहे आणि ती गाडायला हवी आहे.

ठाकरे यांनी सामंतांच्या संपत्तीवरून केलेल्या टीकेवर ते म्हणाले, माझ्या वडिलोपार्जित बांधकामाच्या व्यवसायावरुन
ठाकरे यांनी टीका केली. पण एक गोष्ट चांगली आहे की आमचा व्यवसाय आहे, हे त्यांनी मान्य केले.
कोणताही व्यवसाय नसताना त्यांनी सहा मजली घर कसे बांधले, हा प्रश्न आपण आजपर्यंत कधीही विचारला नाही
आणि यापुढेही विचारणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग

ACB Trap News | आदिवासी व्यक्तीकडून लाच स्वीकारताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

PMC Recruitment Civil Engineer | पुणे महापालिका : सिव्हिल इंजिनियर पदाच्या 113 जागांसाठी 29 हजार 924 अर्ज

जुन्या भांडणाच्या कारणावरुन मोठा भाऊ, वहिनीच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune PMC – Swachh Bharat Mission | स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी ‘स्वच्छ’? 600 टन टिपिंग फी दिली जात असताना प्रशासन 875 रुपये टिपिंग फीचा प्रस्ताव मान्य करणार !

तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, नराधमास अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

Maharashtra Police Suicide News | गळफास घेऊन पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : अश्लील हावभाव करुन महिलेचा विनयभंग, पतीला जीवे मारण्याची धमकी

व्यसनासाठी जमीन विक्रीचा तगादा लावणार्‍या भावाचा खून; शिरुरमधील घोडनदीच्या पात्रात सापडला होता मृतदेह, बीडमधून तिघांना अटक