Udayanraje Bhosale On Ajit Pawar | उदयनराजेंचं अजित पवारांना खुलं आव्हान; म्हणाले – ‘हिंमत असेल तर समोरासमोर या..’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Udayanraje Bhosale On Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या टीकेला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. ‘हिंमत असेल तर समोरासमोर या, आपण दोघेही ईडीच्या (ED) चौकशीला जाऊ. पहिली चौकशी माझी होऊ द्या,’ असे खुले आव्हान उदयनराजेंनी अजित पवारांचं नाव न घेता दिले आहे.

 

“हिंमत असेल सगळ्यांची ईडी चौकशी करा. कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे,” उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. साताऱ्यातील एमआयडीसीचा विकास हा टक्केवारीच्या नेत्यांमुळे रखडला असे विधान अजित पवार यांनी केलं होतं. तसेच, टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना जेलमध्ये टाका, असं ते म्हणाले होते. यानंतर उत्तर देताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.

 

उदयनराजे भोसले म्हणाले, “मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. कोण काय बोललं मला माहित नाही.
हिंमत असेल समोरासमोर यावं. सगळे मिळून ईडी चौकशीला सामोरे जाऊ. पहिली माझी चौकशी करा.
तुमच्यात दम असेल तर तुमची चौकशी करायला ईडीला सांगा.” असे खुले आव्हानच अजित पवार यांना दिले आहे.

 

Web Title :-  mp udayanraje bhosale open challenge to ncp leader ajit pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा