उदयनराजेंनी कृष्णकुंजवर घेतली राज ठाकरे यांची भेट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे खासदार उदयनराजे भोसले शनिवारी (दि. 27) कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, मराठा आरक्षण आणि राज्यातील राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांमध्ये खलबत होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच उदयनराजे हे ठाकरे यांना भेटत असल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

मराठा आरक्षणावर तोडगा निघावा म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी गेल्या काही दिवसांपासून सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या पूर्वी त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपचे नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही त्यांनी भेट घेतली होती. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे मराठा आरक्षणाच्या कार्यक्रमात एकाच मंचावरही आले होते.