खा. उदयनराजेंचा भाजप प्रवेश लांबणीवर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उदयनराजे भोसले हे साताऱ्याचे खासदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देऊन भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी उदयनराजेंची भेट घेतली होती. उदयनराजेंनी सुद्धा आपल्या साताऱ्यातील आणि पुण्यातील कार्यकर्त्यांशी याच मुद्दयांवर संवाद साधला होता.

आज भाजपमध्ये तिसरी मेगाभरती होणार आहे. यामध्ये मात्र उदयनराजेंचं नाव नसल्याचं बोललं जात आहे. काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उदयनराजे यांच्यात दीड तास चर्चा झाली. मात्र याचा कोणताही परिणाम अद्याप तरी दिसून आलेला नाही. त्यामुळे सध्या तरी उदयनराजेंचा भाजप प्रवेश लांबणीवेवर गेल्याचे दिसून येत आहे.

कशी असेल तिसरी मेगाभरती –
भाजपने राज्यातील विरोधकांनाच आपल्या पक्षात घेत सर्व राज्य भाजपमय करण्याचा सपाट सुरु केला आहे. यापूर्वी भाजपने राज्यात दोनदा मेगाभरती करून विरोधी पक्षातील अनेक दिग्गज मंडळी आपल्या सोबत घेतल्याचे पहायला मिळाले होते. यावेळी तिसऱ्या मेगाभरती दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक दिग्गज मंडळी भाजपात प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील उपस्थित असणार आहेत.

आरोग्यनामा ऑनलाइन –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like