MP Udayanraje Bhosale |  ‘विश्वासघाताची आमची परंपरा नाही’, उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकातील निवडणुकीचा निकाल (Karnataka Assembly Elections) सर्वच पक्षांना आत्मचिंतनसाठी महत्त्वाचा आहे. सर्वच पक्ष यावर आत्मचिंतन करतील असे सांगत खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी साताऱ्यात केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, मी राजीनामा दिला मागं घेतला का, त्यांनी राजीनामा (Resignation) दिला मागे घेतला. त्याबद्दल त्यांना विचारा मात्र आमच्या घराण्यात विश्वासघात करण्याची परंपरा नाही, असं सांगत उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले.(MP Udayanraje Bhosale)

शरद पवार साताऱ्या दौऱ्यावर आले असता त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. उदयनराजे यांच्यावर भाजपने (BJP) मोठी जबाबदारी दिली तरी राष्ट्रवादीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत (Lok Sabha By-Elections) अनुभवले आहे, असा टोला लगावला होता. त्यावर उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर पॅलेस (Jalmandir Palace) येथे रोजगार मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. (MP Udayanraje Bhosale)

कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले, कर्नाटकचे स्थानिक प्रश्न वेगळे आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या बाबत असणारे मतदारांचे दृष्टीकोन हे वेगवेगळे असतात त्याचा परिणाम हा असू शकतो. काही गोष्टी खिलाडूपणे घेतल्या पाहिजेत. निवडणुकीत जय पराजय होत असतात. प्रत्येक ठिकाणचा पॅरामीटर वेगवेगळा असतो. निवडणुकीतले शेवटचे तीन दिवस महत्त्वाचे असतात. या निवडणुकीचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत काहीही फरक पडणार नसल्याचे उदयनराजेंनी सांगितले.

 

उदयनराजे पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत.
त्यांचा व्यासंग ही अफाट आहे. त्यामुळे सातारा लोकसभेच्या मागील निवडणुकीतील निकालाबाबत ते जे म्हणाले ते योग्य आहे.
मात्र मी राजीनामा दिला पण मागे घेतला नाही त्यांनी राजीनामा दिला आणि परत मागे घेतला. याबाबत त्यांना विचारा.
यावरुन निवडणुकीत कोण काय करते, काय नाही हा भाग नाही. पण आमच्या घराण्यात विश्वासघात करण्याची परंपरा नाही,
असा टोला त्यांनी शरद पवारांना लगावला.

 

Web Title : udayanraje bhosle criticism of sharad pawar karnataka assembly election result

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा