उदयनराजे तातडीने पुण्याला; पण शरद पवारांचा “सब्र करो” चा इशारा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 
आगामी लोकसभा निवडणुकीकरिता आतापासूनच राजकीय वर्तुळात बैठका सुरु झाल्या आहेत. दरम्यान सातारा येथील लोकसभा मतदार संघातील आगामी निवडणुकांकरिता राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवास्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीला विधानसभा सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते. अगदी दोन -तीन दिवसांपूर्वीच खासदार उदयनराजे भोसले आणि शरद पवार यांची साताऱ्यात भेट झाली होती. या भेटीदरम्यान कोणती चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. मात्र फसवाफसवी करू नका असा इशारा उदयनराजेंनी पवार यांना दिला होता.

 [amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6b9ad8cf-c08a-11e8-9ae3-37535641ea8c’]

दरम्यान, शरद पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आमदारांनी खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे सूत्रांकडून समजते आहे. तसेच लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उदयनराजे नको, इतर कुठलाही उमेदवार द्या, असा सूर या नेत्यांचा होता, अशीही माहिती पुढे येत आहे. याबाबत खासदार उदयनराजेंना संबंधित बैठकीचा वृत्तांत पोहोचताच, त्यांनी थेट पुणे गाठले. त्यानंतर पुण्यातील मोदीबाग या विश्रामस्थानी पवार आणि उदयनराजे यांचीही लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा झाली. त्यावेळी, सकाळच्या बैठकीबाबत उदयनराजेंनी पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यावर उदयनराजेंना हवं असलेलं उत्तर मिळविण्यासाठी वाट पाहण्यास सांगितले आहे. आपण सर्वांशी चर्चा करुन मार्ग काढू असेही पवार यांनी म्हटल्याचे समजते आहे.

दरम्यान, रामराजे नाईक निंबाळकर, शिवेंद्‍र्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे या आमदारांनी पुर्वीचीच भूमिका कायम ठेवत पवारांची बारामतीत भेट घेतली. आता सातारा लोकसभा निवडणुकीकरता कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
[amazon_link asins=’B019XSHB7O,B076CR4CXR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d35ab228-c090-11e8-83e4-3377cf7392d0′]