उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे ‘असे’ 7 वे मुख्यमंत्री, ज्यांनी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (गुरुवार दि 28 नोव्हेंबर) महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. तरीही ते विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत. याआधी महाराष्ट्रातील 6 नेत्यांनी आमदार नसतानाही मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. विशेष बाब अशी की, हे सर्व नेते काँग्रेसचे होते. आमदार नसून शपथ घेणारे असे काँग्रेसेतर पक्षातील उद्धव ठाकरे हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. आता त्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेची निवडणूक लढवावी लागेल.

उद्धव ठाकरेंच्या आधी ज्या नेत्यांनी आमदार नसतानाही मंत्रीपदाचा कारभार स्विकारला त्यात बॅरिस्टर ए आर अंतुले, वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. हे नेतेही विधीमंडळाच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नव्हते. पुढच्या 6 महिन्यात ते विधानसभा आणि विधान परिषदेतवर निवडून आले.

आता उद्धव ठाकरेंनाही विधानसभा किंवा विधान परिषदेतून निवडून यावं लागेल. त्यांच्याकडे यासाठी 6 महिन्यांचा कालावधी आहे. घटनेतील तरतुदीनुसार त्यांना पुढील 6 महिन्यात विधीमंडळाचे सदस्य व्हावे लागेल. राज्यपालांनीही सत्तास्थापनेसाठी दिलेल्या आमंत्रणाच्या पत्रात तसा उल्लेख केला आहे.

युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हेही वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिल्याच व्यक्तीनं निवडणूक लढवली होती. आता महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदाच असं चित्र दिसेल की, वडिल मुख्यमंत्री आहेत तर मुलगा आमदार आहे.

Visit : Policenama.com