Uddhav Thackeray Corona Positive | राज्यपालांनंतर आता उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray Corona Positive | शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यातील राजकारणांच्या घडामोडींना प्रचंड वेग आला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. राज्यपालांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे राजकारणात मोठी चर्चा रंगली असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Corona Positive) यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांना जरी कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती ठीक आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याशी त्यांचं बोलणं झालं आहे, अशी माहिती देखील पटोले यांनी दिली आहे.

 

नाना पटोले म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी कोरोनाची लागण झाली आहेत. त्यांनी आताच कमलनाथ (Kamalnath) यांच्याशी चर्चा केली. आज दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते व्हर्च्युअली सहभागी होतील. विधानसभा बरखास्तीचा कोणताही विचार नाही, पूर्ण ताकदीने सरकार चालवणार,” असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं असल्याचंही ते म्हणाले.

 

Web Title :- Uddhav Thackeray Corona Positive | cm uddhav thackeray tested corona positive maharashtra political crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांनी गृहखात्याला झापलं? म्हणाले – ‘एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही

 

Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार ?, शिवसेना नेते संजय राऊत यांचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…

 

Sharad Pawar And Eknath Shinde | शरद पवार यांच्या नंतरचे राज्यातील सर्वात मोठे बंड; पवार यशस्वी ठरले, एकनाथ शिंदे यशस्वी होतील का?

 

Udayanraje Bhosale | राजकीय घडामोडींवर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच’

 

Maharashtra Political Crisis | ’36 आमदार सोबत, त्यापैकी शिवसेनेचे 33 आणि अपक्ष 3, एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल’; बच्चू कडूंचा मोठा दावा