Uddhav Thackeray | ‘एखाद्याला वापरून फेकून देणं ही भाजपची विशेषत:’, खारघर घटनेवरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर (Maharashtra Bhushan Award) उष्माघाताने 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्यासाठी गुरुवारी एक समिती स्थापन (Establishment of Committee) करण्यात आली आहे. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडलं आहे. तसेच एखाद्याला वापरून फेकून देण्याचे काम भाजपची विशेषता असल्याची टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, भाजपने ज्यांना मतदार बनवायचे होते, त्यांचाच बळी घेतला. फक्त मतांसाठी भाजपने असा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमावर सरकारने केलेला खर्च कुठे गेला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच उन्हात असे कार्यक्रम घेणे चुकीचे आहे, खारघर मधील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (FIR) दाखल केला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

 

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांना पत्र पाठवलं आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी अजित पवारांनी पत्राद्वारे केली आहे.
नुकतेच काँग्रेसने (Congress) देखील राज्यपालांना विशेष अधिवेशन बोलावून निष्काळजीपणा केलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमल्याची माहिती दिली आहे.

 

खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे.
महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल.
एका महिन्याच्या मुदतीत ही समिती याबाबतचा अहवाल सादर करेल.
भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी, दक्षता घ्यावी,
याबाबतही ही समिती शासनास शिफारशी करेल,
अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | it is wrong to take such programs in summer it is bjps specialty to use someone and throw them away says uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political News | ‘काहीही झालं तरी महाराष्ट्रात भूकंप होणारच’, अंबादास दानवेंचं मोठं वक्तव्य

Pune Mahavitaran News | महावितरणच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

MLA Amol Mitkari | ‘ही सैतानी साम्राज्याची सुरुवात, ज्या दिवशी…’, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा सरकारला इशारा