Uddhav Thackeray On Amit Shah | मणिपूर पेटले असताना शेपूट घालणारे गृहमंत्री महाराष्ट्रात फणा काढतात, उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray On Amit Shah | मणिपूर पेटले असताना त्यांची तिकडे जाण्याची हिंमत नाही. तिकडे शेपूट घालणारे गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावर फणा काढून गेले. मविआ म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे, असे ते म्हणाले. आमची रिक्षा पंक्चर झाली असेल कारण ती साध्या माणसाची रिक्षा आहे. पण तुमच्या ट्रिपल इंजिन सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लागली आहेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धाराशिव येथील सभेत केला.(Uddhav Thackeray On Amit Shah)

उद्धव ठाकरे म्हणाले, इतर पक्षाप्रमाणे आमचे आमदार-खासदार फोडले की शिवसेना संपेल असे भाजपाला वाटले असेल. पण शिवसेना तशी संपणार नाही. शिवसेना भाजपाला गाडून, मूठमाती देऊन पुढे जाईल. पण शिवसेना संपणार नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाचे नेते म्हणतात, आम्ही मोदींचे फोटो लावून जिंकलो. पण धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आठवण करून दिली की, मोदी नाव कुणाला माहीत नव्हते, तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो.
भाजपाला आणि मिंधे गटाला आमचे नेते, वडील चोरण्याची वेळ आली आहे. माझे वडील चोरण्याचा प्रयत्न केला तरी यांना हिंदूहृदयसम्राट होता आलेले नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, यावर्षी मे-जूनमध्ये मोदींना माजी पंतप्रधान म्हणावे लागेल.
मोदी-शाह यांची रेकॉर्डिंग अडकली आहे.
तेच तेच वाक्य ते पुन्हा बोलत आहेत. निवडणूक रोख्यांचा गैरव्यवहार आता समोर आला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियातून जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतले असेल तर त्या कसे मागे लागतात, हे सर्वांनाच माहीत आहे.
जप्तीच्या नोटीसा लावतात, घरदार सर्व गहाण ठेवतात.

कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतो. एवढे सगळे रेकॉर्ड बँक ठेवू शकते.
मग हजारो कोटींची उलाढाल असलेला निवडणूक रोख्यांचा तपशील बँकेकडे नाही?
सर्वोच्च न्यायालयाने तपशील उघड करण्याचे आदेश देऊनही बँकेने तीन महिन्यांचा वेळ मागितला आहे.
सामान्य शेतकऱ्यांचा रेकॉर्ड ठेवता, तसे या चोरांचे रेकॉर्ड बँकेकडे कसे नाही? असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रतिक्रिया, ”इतक्या ज्येष्ठ नेत्याने आमदारांना धमकी देणे योग्य नाही”

Kapil Sibal In Supreme Court | ”शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी लवकर निर्णय द्या, कारण…”, कपिल सिब्बल यांचा SC मध्ये युक्तिवाद

Pune News | पुणे जिल्हयातील हॉटेल, बार, परमिट रूम, रेस्टॉरंट रात्री 12.30 ला बंद करा, निवासी उपजिल्हाधिकार्‍यांचा आदेश

सन 2024- 25 या वर्षीचे पुणे महापालिकेचे 11 हजार 601 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर; समाविष्ट गावांतील विकासासाठी 550 कोटी रूपयांची भरवी तरतूद

जिल्ह्यात अवैध धंदे रोखण्यासाठी धडक कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पथारी व्यावसायीकांना देण्यात आलेल्या ‘फेरीवाला प्रमाणपत्रा’ची विक्री बेकायदेशीर

Prakash Ambedkar On Maha Vikas Aghadi Meeting | मविआची बैठक सकारात्मक, प्रकाश आंबेडकरांच्या चेहऱ्यावर हास्य! पुढील बैठकीत जागावाटपाचा अंतिम निर्णय

Indrani Balan Foundation | भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशनमुळे बारामुल्लातील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला मिळाले जीवनदान (Video)

माथाडीच्या नावाखाली पैशांची मागणी करणार्‍यांवर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून कारवाई

Pune Mundhwa Police | मुंढवा पोलिसांकडून नियमभंग करणार्‍या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई

MP Supriya Sule | संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळेंच्या बाजूने, म्हणाल्या ”हे सगळे बहिणीसाठी….”