Uddhav Thackeray-Prakash Ambedkar | ‘आमच्या दोघांच्या आजोबांचे ऋणानुबंध, आपले जमले नसेल पण भविष्यात…’, उद्धव ठाकरेंचे आंबेडकरांना आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray-Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकर यांनी बारामतीत (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पाठिंबा दिला. नागपूरमध्ये (Nagpur Lok Sabha) त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. आंबेडकर यांच्याबद्दल काही बोलणार नाही. आमच्या दोघांच्या आजोबांचे ऋणानुबंध होते. आपण हुकूमशाहीविरुद्ध एकत्र आलो होतो. आज आपले जमले नसेल पण भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका. काही वेळा काही गोष्टी होत नाहीत, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली. त्यात तथ्य नव्हते. आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले असते. पण आम्ही त्यांच्याविरोधात बोललो नाही. बोलणार नाही. त्यांनी माझ्यावर कितीही टीका केली तरी त्यांच्याविरोधात बोलणार नाही. कारण आमच्या दोघांचे आजोबा समाजसुधारणेसाठी एकत्र आले होते.

ठाकरे पुढे म्हणाले, संविधान धोक्यात असताना एकत्र येऊन ताकद दाखवायला हवी होती.
हरकत नाही. माझ्या लोकांना सांगितले आहे की त्यांच्याविरोधात बोलू नका.

उद्धव ठाकरे म्हणाले, शिंदे गटातील कुणालाही शिवसेनेत घेणार नाही.
राजू शेट्टी (Raju Sheety) हे मशाल चिन्हावर लढण्यास तयार नव्हते म्हणून
आम्ही हातकणंगलेमधून (Hatkanangale Lok Sabha) उमेदवार दिला आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक