Uddhav Thackeray | ‘PM मोदी हे नोटबंदीनंतर घासलेलं नाणं’ उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह (Shivsena Dhanushyaban Symbol) गोठवल्याने अंधेरी पोटनिवडणुकीच्या (Andheri By-Election) आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या या कारवाईनंतर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे नोटबंदीनंतर घासलेले, संपलेलं नाण आहे. आपल्याकडे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासारखं खणखणीत नाणं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

मातोश्रीवर (Matoshree) झालेल्या बैठकीला विनायक राऊत (Vinayak Raut), चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire), अरविंद सावंत (Arvind Sawant), सुषमा अंधारे (Sushma Andhare), भास्कर जाधव (Bhaskar Jadhav), सुभाष देसाई (Subhash Desai) उपस्थित होते. या बैठकीनंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

 

मोदींचं नाण खणखणीत

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नोटबंदीनंतर मोदींच्याच नाण्यावर त्यांचे आमदार-खासदार निवडून आले आहेत, हे बहुतेक उद्धव ठाकरे विसरले आहेत. मोदींचं नाण खणखणीत आहे आणि ते कायम राहील, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

 

एकनाथ शिंदेची बाजू वरचढ ठरेल

निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर मला काहीच आश्चर्य वाटत नाही. जेव्हा अशी धुसफूस समोर आली तेव्हा निवडणूक आयोगाने अशी कार्यपद्धती स्वीकारली आहे. निवडणूक आयोग अंतिम निर्णय देईल तेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मांडलेली बाजू वरचढ ठरेल, अशी मला अपेक्षा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

 

हा निखाऱ्यावरचा प्रवास

मातोश्रीवर झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले,
मी भाजपशी (BJP) लढलो, कुटुंबातील लोकांशी लढलो.
ही लढाई लढून मी आपल्या पक्षाचे 63 आमदार निवडून आणले.
आता ही शेवटची निवडणूक आहे. आता आपण जिंकलो तर आपलं सगळं मिळवलं.
हा निखाऱ्यांवरचा प्रवास आहे. या प्रवासात तुम्ही माझ्या सोबत आहात, असं आवाहन त्यांनी उपस्थित नेत्यांना केले.

 

Web Title :- Uddhav Thackeray | shivsena vs shinde uddhav thackeray targets pm narendra modi devendra fadnavis react

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा