उध्दव ठाकरेंचा CM म्हणून शपथविधी झाल्यानंतर नेटकर्‍यांकडून शिवसेना ‘टार्गेट’

0
19
uddhav thackeray
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज पूर्ण झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या 29 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवतीर्थावर झालेल्या शपथविधी सोहळ्याला राज्यातील आणि इतर राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. ज्या शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोप रुजवलं त्याच शिवतिर्थावर आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, उद्धव ठाकरेंचा शपथविधी होताच ट्विटरवर #SorryBalasaheb हा ट्रेंड सुरु झालाय.

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. भाजपला डावलून शिवसेनेनं काँग्रस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली. त्यामुळे भाजप समर्थकांना शिवसेनेचं हे रुप आणि उद्धव ठाकरेंचा हा निर्णय रुचला नाही. त्यामुळे अनेकांकडून शिवसेनेवर टीका होत आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच ट्विटरवर #SorryBalasaheb हा ट्रेंड सुरु झालाय. नाराज नेटीझनकडून हा ट्रेंड सुरु करत, शिवसेनेला टार्गेट करण्यात येत आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, आई-वडिलांचं स्मरण करून आणि संविधानला स्मरून त्यांनी शपथ घेताच शिवतीर्थावर एकच जल्लोष करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राला विधानसभेच्या निकालाच्या ३६ दिवसानंतर महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभला असून राज्यातील सत्तापेचालाही पूर्णविराम मिळाला आहे.

Visit : Policenama.com