Uddhav Thackeray | पुण्यातील पावसाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी साधला देवेंद्र फडणवीसांवर निशाणा, म्हणाले- ‘राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतर ते म्हणू शकतात…’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – ऐन दिवाळी (Diwali) सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शेतकऱ्यांच्या भेटीला बांधावर पोहोचले आहेत. या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) गंगापूर तालुक्यातील दहेगाव, पेंढापूर येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात पिकांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शेतातच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर (State Government) जोरदार हल्लाबोल केला.

 

हेक्टरी 50 हजार मदत मिळाली पाहिजे
पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, पंचनामे कधी करणार, तोपर्यंत शेतकऱ्यांचे हाल होऊन जातात. पंचनामे होईल, तेव्हा होईल. पण ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर केला पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत मिळालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर असतात
एका बाजूला दिवाळी सुरु आहे, आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच दिवाळं निघालं आहे. कपडे काय घालायचे असे प्रश्न सर्वांना पडले आहे, पण शेतकऱ्यांच्या घरी भक्कास असं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात प्रचंड (Rain in Pune) पाऊस झाला, पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही, असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलं. त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तर असतात. आजही ते म्हणतील, संपूर्ण चिखल झाला आहे, पाणी झालं. आता ते असंही म्हणतील, ग्रामीण भागामध्ये किती पाऊस पडावा, हे सरकारच्या हातात नसतं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.

हे उत्सवमग्न सरकार
एकूण काय, आपल्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येत असतं. अशावेळी शेतकऱ्यांना उघड्यावर पडू द्यायचं नसतं. आता नुसती घोषणांची अतिवृष्टी सुरु आहे. या सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे. कृषीमंत्री आले नाही, मुख्यमंत्री आले नाही. हे उत्सवी सरकार आहे, उत्सवमग्न सरकार आहे. फक्त उत्सव साजरे करत आहे. मी उत्सव साजरे करा असं म्हणत नाही. पण उत्सव साजरे करत असताना आपल्या राज्यातील जनता समाधानी आहे की नाही, हे पाहण्याचे काम सरकारचे आहे. हे सरकार अपयशी ठरत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) केली.

 

रेशन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही
जर हे सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती नाही, असं सरकार म्हणतंय म्हणून प्रतिकात्मक ही भेट आहे.
खरंकाय आणि खोटं काय हे सरकारला कळू द्या. रेशन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही.
जो शिधा सरकार वाटत आहे, ते धान्य शेतकऱ्यांकडूनच आलं आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे, 50 हजार हेक्टर मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

 

त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख काय कळणार
मी दोन तासामध्ये दौरा करणार अशी टीका करत आहे. अरे ज्यांना घरामध्ये सर्व काही देऊन ते दुसरीकडे फिरत आहे.
त्यांना शेतकऱ्यांच्या घरातील दु:ख काय कळणार आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला टोला लगावला.

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray criticizes devendra fadnavis after going to aurangabad to interact with rain affected farmers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गट-मनसे युतीबाबत राजू पाटील यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले – ‘वेळ आली आणि राज ठाकरे यांनी…’

Uddhav Thackeray | …याची जबाबदारी घेऊन आज शेतकर्‍यांसमोर माफी मागणार का? – उद्धव ठाकरेंना भाजपाचा सवाल!

Maharashtra Politics | दिपाली सय्यद यांना किशोरी पेडणेकरांचे जशास तसे उत्तर, म्हणाल्या – ‘ठाकरेंवर टीका केली की शिंदे गटात मोठे पद मिळते’