Uddhav Thackeray | हिंदुत्वाच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर पलटवार, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून भाजप (BJP) ‘जनाब सेना’, ‘दाऊदचं सरकार’ अशी विशेषणं वापरुन ठाकरे सरकारला (Thackeray Government) लक्ष्य करत आहे. नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरुन शिवसेनेच्या हिंदुत्वावर (Hindutva) सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या सर्व पार्शभूमिवर शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena party chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी (दि.20) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या (Video Conferencing) माध्यमातून शिवसेनेचे खासदार (MP) आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला.

 

भाजपचे हिंदुत्व (BJP’s Hindutva) हे राजकारणापुरते असल्याची टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. काश्मीरमध्ये (Kashmir) मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्यासोबत युती (Alliance) केली होती, याचा भाजपला विसर पडला का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच आपले विरोधक कोण आहेत आणि ते कशाप्रकारे कुरापती करत आहेत, हे ओळखायला शिका, असा सल्लाही त्यांनी शिवसैनिकांना दिला.

 

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे संकेत दिले आहेत. आपल्यावर एकामागोमाग एक संकट येत आहेत. मी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. मानेचं आणि मणक्याचं संकट असल्याने मला एका जागेवर बसून काम करावं लागत आहे. पण मी लवकरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेन, असे आश्वासन त्यांनी यावेळी शिवसैनिकांना दिले.

शिवसंपर्क अभियान राबवा
यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या भूमिकेविषयी नापसंती व्यक्त केली. विधानपरिषदेतील (Legislative Council) 12 आमदारांची (MLA) अद्याप नियुक्ती झालेली नाही. हा लोकशाहीचा (Democracy) खून असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना राज्यात शिवसंपर्क अभियान (Shiv Sampark Abhiyan) राबवण्याची सूचना केली. तसेच विरोधकांचे मनसुबे हाणून पाडा, असेही सांगितले.

 

MIM शी युती नाहीच
या बैठकीत एमआयएमच्या युती बाबत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले.
ते म्हणाले, एमआयएमशी युती करणार नाही. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे.
त्यांच्याशी शिवसेना युती करणार नाही, असे सांगत एमआयएम सोबतच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray slams bjp over hindutva ideology politics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा