‘मनसे’च्या संदीप देशपांडेंचं खा. संजय राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन मुंबईत पार पडलं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं. शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या ध्वजावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने ‘सामना’तून जहरी टीका केली होती. त्यावर आता मनसेने तीव्र प्रत्युत्तर दिले आहे. “महाराष्ट्रातील या आधुनिक अफजल खानांनी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. याच गोष्टीवर राज ठाकरे यांनी बोट ठेवले असता सामनातून जुलाब बाहेर पडत आहेत,” असे प्रत्युत्तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी खासदार संजय राऊत यांना दिले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी सामन्यातून मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. ते म्हणाले कि, ‘वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येड्याबागळ्यांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला होता.

यावर देशपांडे यांनी संजय राऊत त्यांच्या घरीच कमी शरद पवारांच्या घरीच जास्त असायचे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपविण्याचे काम संजय राऊत करत असल्याचा घणाघात घातला. तसेच देशाच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पुरावे देण्याचे आम्हीच बोललो आहोत. मग आव्हान द्यायची गरज काय, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –