CM Uddhav Thackeray | भाजपसोबत पुन्हा युती करणार का?; उद्धव ठाकरेंचं युतीबाबत मोठं वक्तव्य !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – CM Uddhav Thackeray | राज्यात सध्या अनेक प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मात्र अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजपसोबत (BJP) पुन्हा युती (Shivsena-BJP Alliance) करणार का याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

उद्धव ठाकरे ‘लोकसत्ता’च्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना भाजपसोबत पुन्हा युती करणार का?, असा सवाल करण्यात आला. यावर बोलताना, भाजपची सध्या ज्या दिशेने वाटचाल आणि राजकारण (Politics) चालू आहे त्यामध्ये काही सुधारणा होणार आहे का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. सुरूवातीच्या काळात आम्ही वैचारिक (Ideological) पातळीवर आम्ही एकत्र आलो होतो. पण आता ती वैचारित पातळी पाताळात गेली आहे का तेच समजत नाही. कोणाबरोबर युती करायची याबाबत आम्ही त्यांचाच कित्ता गिरवला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

नव्या पीढीला वाट करुन दिली पाहिजे
नवी पिढी येतेय त्यांना वाट करून दिली पाहिजे आणि लढ म्हटलं पाहिजे.
सगळं आम्हालाच पाहिजे ही वाईट वृत्ती मग आम्ही काय धुणी-भांडी करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray)
शिवसेना स्थापन केली नसल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला.
त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणांवरही (Investigation Systems) खोचक शब्दांत टीका केली.

 

दरम्यान, महाराष्ट्राला (Maharashtra) बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे.
बंगाल (Bangal) आणि महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यात तपास यंत्रणांना काम नाही का?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | Will it form an alliance with BJP again ?; Uddhav Thackeray’s big statement about alliance Shivsena

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | ‘शिवसेना नेते यशवंत जाधवांकडे बॅगा भरुन पैसे आले होते, यासाठी मी वित्त मंत्र्यांना भेटलो’

 

MPSC Recruitment-2022 | अधिकारी होण्याची सुवर्णसंधी ! MPSC मार्फत ‘या’ पदांसाठी भरतीची घोषणा, असा करा अर्ज

 

Income Tax Department Alert | इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने केले अलर्ट, यांच्यापासून रहा सतर्क अन्यथा पैशांचे सुद्धा होऊ शकते नुकसान