‘या’ भारतीय व्यक्तीनं मुलीच्या लग्नात खर्च केले 485 कोटी रुपये, आता झाले ‘दिवाळखोर’ !

नवी दिल्ली : स्टील किंग लक्ष्मी मित्तल यांचे छोटे भाऊ प्रमोद मित्तल यांनी आपल्या मुलीच्या लग्नात सुमारे 485 कोटी रुपये खर्च केले. ते आता ब्रिटनमधील सर्वात मोठे दिवाळखोर झाले आहेत. ते म्हणतात की त्यांच्यावर जवळजवळ 254 कोटी डॉलर्स कर्ज आहे आणि ते सध्या आपल्या पत्नीच्या खर्चावर जगत आहेत.

लंडनच्या इन्सॉल्वेंसी अँड कंपनीज कोर्टानं 64 वर्षांच्या मित्तलला या उन्हाळ्यात दिवाळखोर घोषित केले आहे. ते म्हणतात की त्यांच्यावर एकूण 254 कोटी पौंड (सुमारे 25 हजार कोटी रुपये) चे कर्ज आहे. यात 17 कोटी डॉलर्सचे कर्जदेखील आहे, जे त्यांनी आपल्या 94 वर्षांच्या वडिलांकडून घेतले. त्याचप्रमाणे त्यांनी पत्नी संगीताकडून 1.1 कोटी, मुलगा दिव्यांशकडून 2.4 कोटी डॉलर्स आणि नातेवाईक अमित लोहियाकडून 11 मिलियन डॉलर्स कर्ज घेतले आहे.

ते म्हणतात की आता त्यांच्याकडे केवळ 1.10 लाख पौंडची संपत्ती शिल्लक आहे आणि त्यांचे उत्पन्न नाही. मित्तल आपल्या कर्जदारांचा अगदी छोटासा भाग देण्यास तयार आहेत आणि त्यांना दिवाळखोरीच्या या समस्येवर तोडगा मिळेल अशी आशा आहे. डायरेक्ट इनव्हेस्टमेंट लिमिटेड या ब्रिटीश व्हर्जिन आयलँड कंपनीकडून त्यांनी सर्वात जास्त कर्ज घेतले आहे आणि त्यांना सुमारे 100 कोटी पौंड परत करावे लागतील.

मुलीने विलासी लग्न केले होते

प्रमोद मित्तल यांनी 2013 मध्ये आपल्या मुलीचे सृष्टीचे गुलराज बहल या गुंतवणूक बँकर सोबत लग्न केले होते. यात त्यांनी आपला भाऊ लक्ष्मी मित्तल यांची मुलगी वनिषाच्या लग्नापेक्षा 50 दशलक्ष पौंड (सुमारे 485 कोटी) जास्त खर्च केला.

पत्नी चालवतेय खर्च

मित्तल म्हणाले, ‘आता माझे कोणतेही उत्पन्न नाही. माझी पत्नी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. आमची बँक खाती वेगळी आहेत आणि मला त्यांच्या उत्पन्नाविषयी मर्यादित माहिती आहे. माझे दरमहा सुमारे 2 हजार ते 3 हजार पौंड खर्च मुख्यतः माझी पत्नी आणि कुटुंबीय करीत आहेत. माझ्या दिवाळखोरी प्रक्रियेचा कायदेशीर खर्च देखील कोणीतरी उचलत आहे.

कसे झाले बरबाद

मित्तल उत्तर बोस्नियामधील मेटलर्जिकल कोक प्रॉडक्ट्स कंपनी ग्लोबल इस्पत कोकसाना इंडस्ट्रीकीजा लुकावाक (जीआयकिल) चे सहकारी मालक होते आणि त्यांचे पर्यवेक्षी मंडळाचे प्रमुख होते. परंतु या कंपनीच्या कर्जासाठी त्यांनी वैयक्तिक हमी दिली होती आणि येथून त्यांचे वाईट दिवस सुरू झाले. 2013 मध्ये ही कंपनी सुमारे 16.6 कोटी डॉलर्सचे कर्ज परत करण्यात अपयशी ठरली.

प्रमोद मित्तल यांना गेल्या वर्षी कंपनीच्या अन्य दोन अधिकाऱ्यांसह अटक करण्यात आली होती. भारतातही सार्वजनिक कंपनी स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एसटीसी) कडे सुमारे 2,200 कोटी रुपयांची मनी लोड्रिंग केल्याचा आरोप आहे.