‘या’ यशस्वी क्रिकेटरची कहाणी ऐकून रडू कोसळेल तुम्हाला ! खर्चाच्या पैशासाठी विकली ‘पाणीपुरी’ तर ‘तंबूत’ काढली रात्र, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – 2013 मध्ये मुंबईच्या आझाद मैदानात यशस्वी जयस्वाल वर अशा व्यक्तीची नजर पडली, जो त्यांच्याप्रमाणेच क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईत आला होता. त्या व्यक्तीने मुंबईत अनेक धक्के खाल्ले होते, आर्थिक चणचण जवळून पाहिली होती. बहुतेक यामुळेच त्याने यशस्वीला योग्य पद्धतीने ओळखले. ही व्यक्ती अन्य कुणी नसून ते यशस्वीचे कोच ज्वाला सिंह आहेत.

ज्वाला सिंह, क्रिकेट जगताशी जोडलेले एक असे नाव आहे जे आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपच्या दरम्यान पुन्हा चर्चेत आले आहे. होय, ते हेच ज्वाला सिंह आहेत, ज्यांनी टीम इंडियासाठी दोन असे जबरदस्त खेळाडू तयार केले आहेत, ज्यांचा खेळ आतापर्यंत आश्चर्यकारक ठरला आहे. हे खेळाडू आहेत गोलगप्पा बॉय यशस्वी जयस्वाल आणि पृथ्वी शॉ.

ज्वाला सिंह सध्या साउथ अफ्रिकेत आहेत, जेथे अंडर-19 वर्ल्ड कप खेळला जात आहे. ज्वाला सिंह यांनी याबाबत बोलातना यशस्वी जयस्वाल आणि पृथ्वी शॉ यांच्या सोबत आपली कहाणीसुद्धा शेयर केली. यूपीच्या गोरखपुरचे ज्वाला सिंह 1995 मध्ये मुंबईत आले. ज्वाला यांनी क्रिकेटसाठी हट्ट करून जिद्दीने घर सोडले होते. त्यांना घरातूनही म्हणावा तसा पाठींबा मिळाला नव्हता. अशा स्थितीत मायानगरीत त्यांना स्वताची जागा स्वताच तयार करावी लागली.

जिद्दीने आले मुंबईत, तंगूत घालवली रात्र…

डावखुरे वेगवान गोलंदाज असलेले ज्वाला सिंह यांनीही आपल्या संघर्षात तंबूत अनेक रात्र घालवल्या आहेत. तंबूत अनेक महिने काढल्यानंतर एका स्थानिक आमदाराने त्यांची राहण्याची व्यवस्था केली. परंतु, करियरमधील पुढील गरजांसाठी त्यांना स्वताची लढाई स्वताच लढावी लागली. या लढाईला त्यांनी तोंड दिले. त्यांना विजय मर्चंट ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली. कूच विहार आणि सीके नायडू ट्रॉफीनंतर त्यांच्या जीवनात दुखापतीने प्रवेश केला. नॅशलन क्रिकेट अ‍ॅकेडमीतून परतल्यानंतर त्यांना अशी दुखापत झाली की क्रिकेटला जवळपास ब्रेकच लागला. ज्वाला यांनी सांगितले की योग्य सल्ला न मिळाल्याने काहीच करता आले नाही.

दुखपतीनंतर संपले करियर…

गंभीर दुखापतीनंतर ज्वाला यांना जाणीव झाली की पुढील रस्ता दुखापतीच्या अडचणीचा आहे. यानंतर ज्वाला पुन्हा क्लब क्रिकेटकडे वळले आणि हळूहळू त्यांनी आपली क्रिकेट अ‍ॅकेडमी सुरू केली, जिचे नाव ज्वाला क्रिकेट फाउन्डेशन आहे. त्यांच्या याच अ‍ॅकेडमीतून यशस्वी जयस्वाल आणि पृथ्वी शॉसारखे खेळाडू तयार झाले आहेत.

2013 मध्ये झाली होती पहिली भेट…

ज्वाला यांनी सांगितले की, यूपीच्या भदोही जिल्ह्यातून यशस्वी 2011 मध्ये मुंबईत आला होता. त्याची स्वप्नही माझ्यासारखीच होती, फक्त परिस्थिती त्याला झेप घेऊ देत नव्हती. परंतु, हा मुलगा जिद्दी होता आणि त्याला काहीतरी करायचे होते. 2013 मध्ये माझी त्याच्याशी पहिली भेट झाली. मी त्याला माझ्या अ‍ॅकेडमीत बोलावले. यापूर्वी माझ्या एका मित्राने त्याच्याबद्दल सांगितले होते. तो कॅम्पमध्ये आला, त्यानंतर काही दिवसांनी मी त्याला माझ्या घरी घेऊन गेलो, तेव्हापासून तो माझ्यासोबतच राहतो. ज्वाला यांनी सांगितले की, मला खात्री आहे की, एक दिवस तो सीनियर टीममध्ये दिसेल.

4 वर्षापर्यंत ज्वाला यांच्यासोबत होता पृथ्वी शॉ

टीम इंडियासाठी खेळत असलेल्या पृथ्वी शॉबाबत ज्वाला यांनी सांगितले की, 2015 मध्ये पृथ्वी शॉ त्यांच्याकडे आला आणि 2018 पर्यंत त्यांच्या सोबत होता. 2013 मध्ये स्कूल क्रिकेटमध्ये पृथ्वीने शानदार 546 धावा केल्या. परंतु, त्यानंतर खुप काळ तो चांगला खेळ करू शकला नव्हता. 2015 मध्ये पृथ्वी मला भेटला, ज्यानंतर मी त्याला माझ्या अ‍ॅकेडमीमध्ये घेऊन आलो. येथून तो अंडर-19 वर्ल्ड कपसाठी कर्णधार झाला आणि आज टीम इंडियासाठी खेळत आहे. ज्वाला यांनी सांगितले की, पृथ्वी मोठा डाव खेळण्यावर विश्वास ठेवतो. विकेटवर वेळ देतो, त्याची हिच खुबी त्याला मोठा फलंदाज बनवत आहे.

व्हायरल फोटोत यशस्वीचे पिता नाहीत

पाकिस्तानविरूद्ध शानदार नाबाद 105 धावांची खेळी करणारा यशस्वी सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. या दरम्यान सोशल मीडियावर पाणीपुरी स्टॉलचा त्याचा एक फोटोसुद्धा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो वडीलांसोबत असल्याचे म्हटले जात आहे, परंतु पाणीपुरीचे दुकान त्याच्या वडीलांचे नव्हते. एका शुटच्या दरम्यान यशस्वी त्या स्टॉलवर उभा होता आणि तो फोटो व्हायरल झाला आहे. यशस्वीचे आई-वडील गावीच असतात. वर्षातून दोन-तीनवेळा मुंबईत त्याला भेटण्यासाठी येतात. सध्या यशस्वी आपले कोच ज्वाला सिंह यांच्या सोबत राहतो.